नोटा बंद झाल्यात... पण आकाश कोसळलेलं नाही!

  Pali Hill
  नोटा बंद झाल्यात... पण आकाश कोसळलेलं नाही!
  नोटा बंद झाल्यात... पण आकाश कोसळलेलं नाही!
  नोटा बंद झाल्यात... पण आकाश कोसळलेलं नाही!
  नोटा बंद झाल्यात... पण आकाश कोसळलेलं नाही!
  नोटा बंद झाल्यात... पण आकाश कोसळलेलं नाही!
  See all
  मुंबई  -  

  मुंबई – चलनातल्या 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय झाला असला तरी घाबरण्याचं कारण नाही. आकाश कोसळलेलं नाही. उगाच धावपळ, चिंता करू नका. तुमचा कष्टाचा पैसा पूर्णतः सुरक्षित आहे...

  पंतप्रधान मोदींनी हा निर्णय जाहीर करतानाच मंगळवारी मध्यरात्रीनंतरही टोल, पेट्रोल, रेल्वे-बस तिकिटं, रुग्णालयं, केमिस्ट अशा अनेक ठिकाणी या नोटा चालतील हे सांगितलं होतं. पण हे नीट समजून न घेताच धावपळ सुरू झाली. रात्री 9 वाजल्यापासून सगळीकडेच एटीएमसमोर रांगा लागल्या. त्यात सोशल मीडियातल्या विनोदांनी भर घातली.
  लक्षात घ्या, हजार-पाचशेच्या नोटा हा तुमच्या पदरातला जळता निखारा अजिबातच नाहीये. तुमच्याकडे या जितक्या नोटा आहेत, त्या सगळ्या तुम्ही बँकेतल्या खात्यात भरू शकाल. फक्त नव्या नियमांनुसार तुम्हाला ओळखपत्र (पॅनकार्ड, आधारकार्ड वा व्होटरकार्ड) दाखवावं लागेल, इतकंच. त्यामुळे काळाबाजार करणारे नसाल, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये.
  याशिवाय पैसे खात्यात न भरता नोटा बदलून घेण्याची सोयही सरकारनं दिली आहेच. फक्त त्यासाठी घातलेल्या अटींचं पालन करावं लागेल इतकंच.

  पॉइंटर्स
  - थोडंसं समजुतीनं घेऊया. पेट्रोलपंप, टोलनाक्यांवर 500, 1000च्या नोटा ‘खपवण्या’ची धडपड थांबवूया
  - शुक्रवारपासून एटीएम सुरू होतील. ती नेहमीसारखीच चालणार आहेत. त्यामुळे एटीएमचेच बारा वाजतील अशा प्रकारे हल्लाबोल टाळूया
  - 2 हजार आणि 500च्या नव्या नोटाही गुरुवारपासून चलनात येतील. त्यातून अडचणी बऱ्यापैकी दूर होतील, हे समजून घेऊया
  - त्रास होतोय. होईल, पण संयम ठेवूया
  शनिवारी आणि रविवारी बँका खुल्या राहणार

  दरम्यान अर्थतज्ज्ञ राघव नरसाळे काय म्हणाले ते पाहू...
  'पॅनिक व्हायचं कारण नाही. पतपुरवठा अजिबात कमी झालेला नाही. फक्त आपण थोडी वाट बघण्याची गरज आहे. निर्णय जाहीर झाल्यानंतर अचानक सोन्याच्या खरेदीत वाढ झाली. पण लगेच घाबरून गुंतवणूक करण्याची गरज नाही. कारण कदाचित नंतर गुंतवणुकीचा तुम्हाला हवा तितका परतावा मिळणार नाही. त्यामुळे काही दिवस वाट पहा. बँका सुरू झाल्यानंतर तुमच्याकडच्या जुना नोटा तुमच्या खात्यात जमा करता येतील.'

  मुख्यमंत्री म्हणतात...

  ‘ज्यांनी कष्टानं पैसा कमावला त्यांनी घाबरू नका’
  ‘काळा पैसा कमावलाय त्यांच्यावर आता घाबरण्याची वेळ आलीय’
  ‘बँकांचा व्यवहार सुरू झाल्यावर अडचणी दूर होतील’


   

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.