Advertisement

करदात्यांना दिलासा! ITR फाइल करण्याची मुदत वाढवली

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी इनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्याची मुदत वाढवली आहे.

करदात्यांना दिलासा!  ITR फाइल करण्याची मुदत वाढवली
SHARES

 केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी इनकम टॅक्स रिटर्न  (ITR) फाईल करण्याची मुदत वाढवली आहे. ३१ जुलैपर्यंत आयटीआर भरता येणार आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने याआधी आर्थिक वर्ष २०१९-२० साठी आयटीआरची अंतिम तारीख वाढवून ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत केली आहे.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची तारीखही सरकारने वाढवली आली आहे. आता ३१ मार्च २०२१ पर्यंत  आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करता येणार आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने एका अधिसूचनेच्या माध्यमातून आर्थिक वर्ष २०१९-२०  साठी आयटी अधिनियमाच्या अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी विभिन्न गुंतवणुकीची मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत वाढवली आहे. 

आयटी कायद्याच्या अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी विभिन्न गुंतवणुकीची मुदत ज्यामध्ये ८० C (LIC, PPF, NSC आदी), ८० D (मेडिक्लेम), ८० G (Donation) इत्यादी वाढवून ३१ जुलै २०२० करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०१९-२०  साठी या सेक्शन अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी ३१  जुलैपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. २०१९-२० साठी इनकम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख ३१ जुलै २०२०  वरून ३०  नोव्हेंबर २०२० करण्यात आली होती. तर टॅक्स ऑडिटची तारीख ३१ ऑक्टोबर करण्यात आली आहे.हेही वाचा -

Mission Zero: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'मिशन झिरो' मोहीम

Coronavirus Pandemic: मुंबईत २१४१ रुग्णांची कोरोनावर मात, ५८ जणांचा दिवसभरात मत्यू
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा