Advertisement

सुट्या पैशांअभावी केमिस्टची दुकानं बंद


सुट्या पैशांअभावी केमिस्टची दुकानं बंद
SHARES

परळ - 500 आणि एक हचाराच्या नोटांवरील बंदीमुळे रुग्णांना सुट्टे पैशाअभावी औषध मिळणंही कठीण झालं आहे.

रुग्णांना 24 तास सेवा देणारे परळमधील नॅशनल, न्यू स्वस्तिक आणि दी परळ ही केमिस्टची दुकानं बुधवारी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे औषध मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी या केमिस्टच्या दुकानांवरच हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. पण केमिस्टवर कोणताच परिणाम होत नसल्याचं निष्पन्न झाल्यानं वाद वाढला. मात्र या वादाचं रुपांतर हाणामारीत होण्यापूर्वी पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली.
अखेर वातारण थंड झालं तरी रुग्णांना सुट्ट्या पैशाअभावी औषध मिळालेच नाही. त्यामुळं रुग्णांमधून मोदी सरकारच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता.

संबंधित विषय
Advertisement