Advertisement

नागरी सहकारी बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सहकारी बँकांच्या पर्यवेक्षणाचे अधिकार पूर्णत्वाने रिझव्‍‌र्ह बँकेच्या हाती देण्याच्या निर्णयाची वटहुकूम काढून अंमलबजावणी केली जाणार आहे

नागरी सहकारी बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
SHARES

शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट को -ऑपरेटिव्ह बँकांना रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाची माहिती दिली.

सहकारी बँकांच्या पर्यवेक्षणाचे अधिकार पूर्णत्वाने रिझव्‍‌र्ह बँकेच्या हाती देण्याच्या निर्णयाची वटहुकूम काढून अंमलबजावणी केली जाणार आहे. शासकीय, नागरी सहकारी व मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह बॅंकांमध्ये ठेवी असलेल्या ठेवीदारांच्या दृष्टीनं हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या बँकांमधील ठेवींना सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारनं या बँका रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणल्या आहेत.

पीएमसीप्रमाणेच इतरही सहकारी बँका बुडाल्याच्या घटना गेल्या वर्षभरात घडल्या आहेत.  यामुळे ठेवीदार अडचणी आले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता शासकीय बँका व नागरी सहकारी बँकांसह १४८२ बँक,  ५८ मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह बँका रिझर्व्ह बॅंकेच्या देखरेखीखाली आल्या आहेत. शेड्यूल बँकांप्रमाणेच सहकारी बॅंकांसाठी आरबीआयला आपला अधिकार वापरता येणार आहे.

सहकारी बँकांना आरबीआयच्या देखरेखीखाली आणण्याच्या निर्णयाचा ठेवीदारांसह सर्व भागधारकांना फायदा होईल. या बँकां  कारभारही सुधारला जाईल. गेल्या काही वर्षांत या बँकांमध्ये घोटाळे झाल्यामुळे या नियंत्रणाची अधिक गरज होती.

- आशित शाह, भागीदार, जे सागर असोसिएट्स

या बँकांमध्ये ठेवी ठेवलेल्या ८.६ कोटी ठेवीदारांना त्यांच्या ठेवीपोटी असलेले ४.८४ लाख कोटी रुपये सुरक्षित असल्याची हमी दिली जाणार आहे, असं जावडेकर यांनी सांगितलं. सहकारी बँकांवर रिझव्‍‌र्ह बँक आणि राज्यांचे सहकार निबंधक असे दुहेरी नियंत्रण होते. आतादुहेरी नियंत्रण संपुष्टात येऊन या बँकांवर  फक्त आरबीआयचे नियंत्रण असेल.  आता रिझव्‍‌र्ह बँक ही एखाद्या नागरी बँकेचे पूर्ण संचालक मंडळ अथवा एखाद दुसरे दोषी संचालक यांना थेट बरखास्त करू शकते.



हेही वाचा -

अंधेरी बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव

Cops Track Down 44 ‘Missing’ Covid Patients : ‘त्या’ बेपत्ता रुग्णांना शोधण्यात यश




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा