Advertisement

पीपीएफनंतर राष्ट्रीय पेंशन योजनेमधून पैसे काढण्याची परवानगी

पीपीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी दिल्यानंतर आता राष्ट्रीय पेंशन योजनेमधून पैसे काढू शकता.

पीपीएफनंतर राष्ट्रीय पेंशन योजनेमधून पैसे काढण्याची परवानगी
SHARES

कोरोना व्हायरस संकटाच्या काळात लोकांना कोणत्या समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. नागरिकांना या काळात पैशाची समस्या येऊ नये, यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. याशिवाय विविध खात्यांमधून पैसे काढण्याची परवानगी देखील देण्यात येत आहे. पीपीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी दिल्यानंतर आता राष्ट्रीय पेंशन योजनेमधून (एनपीएस) देखील काही प्रमाणात रक्कम काढण्यास परवानगी दिली आहे.

याचा फायदा जवळपास १.५ कोटी एनपीएस खातेधारकांना होणार आहे. पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानुसार एनपीएस खातेधारकांना कोव्हिड-19 च्या उपचारासाठी काही प्रमाणात रक्कम काढता येईल.

पीएफआरडीएनं राष्ट्रीय पेंशन योजनेच्या सर्व भागधारक आणि खातेधारकांसाठी जारी सर्क्युलरमध्ये सांगितले की, भारत सरकारनं कोव्हिड-19 ला महामारी म्हणून घोषीत केलं आहे. त्यामुळे एनपीएसच्या खातेधारकांना खात्यातून काही प्रमाणात रक्कम काढण्याची परवानगी दिली जात आहे.

पीएफआरडीएनं सांगितलं की, ही रक्कम गरज पडल्यास खातेधारक, जोडीदार, मुले, पालक यांच्या उपचारासाठी दिली जाईल. मात्र ही सुविधा अटल पेंशन योजनेच्या खातेधारकांसाठी नाही.



हेही वाचा

पोस्टाच्या 'या' योजनांचा प्रीमियम भरण्यास मुदतवाढ

कोरोनाशी लढण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकचा मदतीचा हात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा