नोटबंदीचा फॅशन स्ट्रीटला फटका

चर्चगेट - फॅशन ,शॉपिंग.. म्हणजे तरुणाईची जान..त्यासाठी चर्चगेटचा फॅशन स्ट्रीट ही तेवढाच प्रसिद्ध आहे. पण चलनबंदीचा परिणाम फॅशन मार्केटवरही झालेला दिसून येतोय. पैसे सुट्टे नसल्यानं तरुणांनी फॅशन आणि शॉपिंगकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. त्यामुळे रोजचा व्यवहार करण्यासाठी काही विक्रेत्यांनी पेटीएम आणि स्वाईप मशीनची मागणी केलीय.

मोदींनी संपूर्ण भारताला कॅशलेस करण्याचं स्वप्न उराशी बाळगलंय. एकीकडे नागरिकांनी नोटबंदीचा निर्णय स्विकारलाय. मात्र, त्यांना होणारा त्रासही टाळता येणार नाही हे देखील तितकंच खरं आहे.

Loading Comments