नोटबंदीचा फटका पालिकेच्या कारवाईवर

 Santacruz
नोटबंदीचा फटका पालिकेच्या कारवाईवर
नोटबंदीचा फटका पालिकेच्या कारवाईवर
नोटबंदीचा फटका पालिकेच्या कारवाईवर
See all

वांद्रे - अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी पोलीस संरक्षण दिलं जात नसल्यानं  बेहरामपाडा, गरीबनगर येथील अनधिकृत बांधकामं आणि झोपड्यांवर सुरू असलेली कारवाई पालिकेनं थांबवली आहे. 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटबंदीमुळे नोटासाठी बँकेत दररोज होणारी लोकांची गर्दी, लांबच लांब रांगा लागत असल्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षा पुरवण्यासाठी पोलिसांना तेैनात करण्यात येत आहे. पोलीस या सुरक्षेत गुंतल्यामुळे मुंबई महापालिकेला झोपड्यांच्या 14 फुटांवरील बांधकामं तसंच परिणामी अतिक्रमणावरील कारवाई पालिकेला पुढे ढकलावी लागलीय. एच पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता पोलीसही नोटबंदीमुळे बँकेला सुरक्षा व्यवस्था देत असल्याचं कारण सांगत नोटबंदी प्रकरण संपताच कारवाई सुरू करणार असं त्यांनी म्हंटलंय. 

Loading Comments