Advertisement

फेब्रुवारीपर्यंत विमान तिकीट दर निश्चित

मार्च महिन्यात देशात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यावेळी देशातील विमानसेवाही बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर २५ मे रोजी विमानसेवा सुरू करण्यात आली होती.

फेब्रुवारीपर्यंत विमान तिकीट दर निश्चित
SHARES

लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर विमान वाहतूक सुरू करण्यात आली. यावेळी विमान देशांतर्गत विमान  प्रवास तिकिटांचे किमान आणि कमाल दर निश्चित करण्यात आले होते. आता फेब्रुवारी महिन्यांपर्यंत हे दर कायम राहणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली.

मार्च महिन्यात देशात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यावेळी देशातील विमानसेवाही बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर २५ मे रोजी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. २१ मे रोजी डीजीसीएनं देशांतर्गत विमान तिकिटांच्या दरासाठी कमाल आणि किमान दर निश्चित करत सात बँडची घोषणा केली होती. २४ ऑगस्टपर्यंत हे दर निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर २४ नोव्हेंबरपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

असे आहेत सात बँड 

पहिल्या बँडमध्ये उड्डाणांचा कालावधी ४० मिनिटांपेक्षा कमी आहे. पहिल्या बँडमधील उड्डाणांसाठी किमान २ हजार रूपये आणि कमाल ६ हजार रूपये दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानंतर ४० ते ६० मिनिटं, ६० ते ९० मिनिटं, ९० ते १२० मिनिटं, १२० ते १५० मिनिटं, १५० ते १८० मिनिटं आणि १८० ते २०० मिनिटं असे बँड तयार करण्यात आले आहेत. डीजीसीएद्वारे याचे किमान आणि कमाल दर २,५०० रूपये ते ७,५०० रूपये, ३,००० रूपये ते ९,००० रूपये, ३,५०० रूपये ते १०,००० रूपये, ४,५०० रूपये ते १३,००० रूपये, ५,५०० रूपये ते १५,७०० रूपये आणि ६,५०० रूपये ते १८,६०० रूपये इतके निश्चित करण्यात आले आहेत.



हेही वाचा -

फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांविरोधात भेंडी बाजारात अनोखे आंदोलन

पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा