Advertisement

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या नवे दर

7 मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा आज वाढ करण्यात आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या नवे दर
SHARES

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसह दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत (Gas cylinder rate) 1000 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. यासोबतच व्यावसायिक गॅस सिलिंडरची (Commercial gas cylinder) किंमत आठ रुपयांनी वाढली आहे.

गुरुवारी जारी करण्यात आलेल्या घरगुती आणि व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या नव्या दरानुसार मुंबई आणि राजधानी दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलिंडरचे दर 1 हजार 3 रुपये इतके झाले आहेत. कोलकातामध्ये या गॅसचा दर 1,029 रुपये इतका आहे. तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1018 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. या आधी 7 मे रोजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

7 मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या 15 दिवसांमधील आज करण्यात आलेली ही दुसरी दरवाढ आहे. त्यापूर्वी एक मे रोजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती.

शातील प्रमुख शहरांतील घरगुती सिलिंडरचे दर (14.2 किलोग्राम)

  • दिल्ली-1003 रुपये
  • कोलकाता-1029 रुपये
  • मुंबई-1002.50 रुपये
  • चेन्नई- 1018.50 रुपये

19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर

  • दिल्ली- 2354 रुपये
  • कोलकाता-2454 रुपये
  • मुंबई-2306 रुपये
  • चेन्नई- 2507 रुपयेहेही वाचा

एसबीआयकडून पुन्हा व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवे व्याजदर

गृह, वाहन कर्ज महागणार, EMI मध्ये मोठी वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा