Advertisement

कर्जाचा हफ्ता चुकला तरी सिबील रेकॉर्डवर परिणाम नाही

कर्जाचा हफ्ता पुढील तीन महिने देता आला नाही तरी त्याचा कोणताही परिणाम तुमच्या सिबिल रेकॉर्डवर होणार नाही. सिबिलने तसा निर्णयच घेतला आहे.

कर्जाचा हफ्ता चुकला तरी सिबील रेकॉर्डवर परिणाम नाही
SHARES

 कोरोनामुळे लागू केलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका अनेकांना बसला आहे. काहींना आर्थिक झळही बसणार आहे. अशा परिस्थितीत काहींना कर्जाचा हप्ताही भरता येणं शक्य नाही. मात्र, कर्जाचा हफ्ता पुढील तीन महिने देता आला नाही तरी त्याचा कोणताही परिणाम तुमच्या सिबिल रेकॉर्डवर होणार नाही. सिबिलने तसा निर्णयच घेतला आहे.  

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना अडचणी येऊ नयेत म्हणून कर्जदारांना कर्जाचा हप्ता भरण्यास 3 महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असं आवाहन मागील आठवड्यात आरबीआयने सर्व बँकांना केलं आहे. 3 महिन्यांच्या कालावधीत बँकांनी कर्जदारांच्या खात्यातून कर्जाचा मासिक हप्ता परस्पर कापू नये, असंही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. 

सिबिल रेकॉर्ड बघूनच कोणतीही बँक किंवा वित्तसंस्था ग्राहकाला कर्ज द्यायचे की नाही याचा निर्णय घेत असते. रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारावर सिबिलने हा निर्णय घेतला आहे. कर्जाशी संबंधित सर्व माहिती जमविणाऱ्या सिबिलकडून सोमवारी महत्त्वाची माहिती देण्यात आली. लॉकडाऊननंतर रिझर्व्ह बँकेने कोणत्या सूचना केल्या आहेत. त्या सर्वांचा अभ्यास केला जात असल्याचे म्हटले आहे.

 सिबिलने म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना ग्राहकांचे हफ्ते तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आम्ही सर्व बँकांनी कोणाकोणाला कर्ज दिले, त्याची माहिती गोळा करीत आहोत. ही माहिती जमविल्यावर आम्ही कोणत्याही ग्राहकाचा जर हफ्ता पुढील तीन महिन्यांत चुकला तर त्याच्या सिबिल रेकॉर्डवर कोणताही परिणाम न होण्यासाठी व्यवस्थेमध्ये आवश्यक बदल करीत आहोत.



हेही वाचा -

राज्यात २१ ते ३० वयोगटात सर्वाधिक कोरोना रुग्ण

‘रामायण’, ‘महाभारता’नंतर 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा