Advertisement

थोडी खुशी, थोडा गम! थर्टी फर्स्टला झिंगा, पण बियरसाठी जादा दाम मोजा

थर्टी फर्स्टच्या अगोदर बियरचा तुटवडा झाल्याने मद्य विक्रेत्यांसह ग्राहकही सैरभैर झाले होते. मात्र, आता मद्यप्रेमींना निराश होण्याची गरज नाही. कारण मद्य उत्पादक कंपन्यांनी बियरचं उत्पादन पुन्हा सुरू केल्याने बाजारात लवकरच बियर उपलब्ध होणार आहे. पण मद्यप्रेमींना माइल्ड बियरबरोबर स्ट्राँग बियरसाठी जादा दाम मोजावे लागणार आहेत.

थोडी खुशी, थोडा गम! थर्टी फर्स्टला झिंगा, पण बियरसाठी जादा दाम मोजा
SHARES

माइल्ड बियरच्या उत्पादन शुल्कात दीड महिन्यांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाने वाढ केल्याने बियर कंपन्यांनी माइल्ड बियरचं उत्पादनच बंद केलं होतं. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून बाजारातून माइल्ड बियर गायब झाली होती. तर स्ट्राँग बियरचीही टंचाई निर्माण झाली होती. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे थर्टी फर्स्टच्या अगोदर बियरचा तुटवडा झाल्याने मद्य विक्रेत्यांसह ग्राहकही सैरभैर झाले होते. मात्र, आता मद्यप्रेमींना निराश होण्याची गरज नाही. कारण मद्य उत्पादक कंपन्यांनी बियरचं उत्पादन पुन्हा सुरू केल्याने बाजारात लवकरच बियर उपलब्ध होणार आहे. पण मद्यप्रेमींना माइल्ड बियरबरोबर स्ट्राँग बियरसाठी जादा दाम मोजावे लागणार आहेत.


बियर महाग का?

राज्य उत्पादन शुल्क विभागाने माइल्ड आणि स्ट्राँग बियरच्या किंमती वाढवण्यास
मद्य उत्पादक कंपन्यांना परवानगी दिली आहे. यासंबंधीचं परिपत्रक नुकतंच उत्पादन शुल्क विभागाने जारी केलं आहे. शनिवार २३ डिसेंबरपासूनच नवे दर लागू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र वाईन्स मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप जीयानानी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


काय आहे प्रकरण?

बियरच्या उत्पादन शुल्कात दीड महिन्यांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाने ३५ टक्क्यांनी वाढ केली. उत्पादन शुल्क वाढल्याने नाराज कंपन्यांनी बियरच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी केली. मात्र या मागणीकडे उत्पादन शुल्क विभागाकडून कानाडोळा केला. त्यामुळे कंपन्यांनी तीन आठवड्यांपूर्वी माइल्ड बियरचं उत्पादन बंद केलं तर स्ट्राँग बियरचं उत्पादन कमी केलं. परिणामी बियरची टंचाई झाली. याचा फटका मद्य विक्रेत्यांना बसू लागला. त्यामुळे कंपन्यांसह मद्य विक्रेत्यांनीही बियरच्या किंमतीत वाढ करण्यास परवानगी देण्याची मागणी उचलून धरली होती.


मागणी मान्य

अखेर ही मागणी उत्पादन शुल्क विभागाने मान्य केली असून माईल्डसह स्ट्राँग बियरच्या किंमतींमध्ये बदल करण्यास कंपन्यांना परवानगी देणारं परिपत्रक २२ डिसेंबरला जारी करण्यात आलं आहे. कंपन्यांची मागणी मान्य झाल्याने आता माईल्ड आणि स्ट्राँग बियर ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टला मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध होईल.


एका बाटलीमागे किती वाढ?

नव्या किंमतीनुसार आता बियरच्या एका बाटलीमागे २५ ते ३० रुपयांची वाढ होणार असल्याचं जीयानानी यांनी सांगितलं. त्याप्रमाणे किंगफिशरची बाटली जिथे १४५ रुपयांना मिळायची तिथे शनिवारपासून ती १७० रुपयांना मिळणार आहे. तर टुबोर्गसाठी १४५ रुपयांएेवजी १७० आणि एलपीसाठी १२५ एेवजी १५० रुपये मोजावे लागणार आहेत.



हेही वाचा-

उत्पादनशुल्क विभागाचा 'झिंगाट' निर्णय, दारूपार्टीसाठी मिळेल आॅनलाईन परवानगी

थर्टी फर्स्टचा बट्ट्याबोळ? बाजारातून बियर गायब

मनसोक्त प्या! ख्रिसमस, थर्टी फर्स्टला हाॅटेल, बार पहाटेपर्यंत खुले



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा