Advertisement

मुंबई किनारपट्टीवर 'चोरी चोरी चुपके चुपके' पर्ससीन मासेमारी?

महिन्याभरापूर्वीच केंद्र सरकारने पर्ससीन मासेमारीवर कायदेशीर बंदी घातल्याने बेकायदा मासेमारीला चाप बसेल अशा विश्वास मच्छिमारांना होता. मात्र मुंबईतील मच्छिमारांचा हा विश्वास खोटा ठरला आहे. कारण या बंदीनंतरही मुंबईच्या किनारपट्ट्यांवर पर्ससीन नेटने लपून छपून मासेमारी सुरू असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे.

मुंबई किनारपट्टीवर 'चोरी चोरी चुपके चुपके' पर्ससीन मासेमारी?
SHARES

एका बाजूला प्रदूषणामुळे मुंबई किनारपट्टीलगतच्या समुद्रात मासे कमी होत असतानाच दुसरीकडे पर्ससीन मासेमारीने पारंपरिक मच्छिमारांची डोकेदुखी आण्खी वाढवली आहे. राज्य सरकारने २०१६ मध्ये पर्ससीन नेटने करण्यात येणाऱ्या मासेमारीला बंदी घातली होती. त्यानंतर महिन्याभरापूर्वीच केंद्र सरकारनेही पर्ससीन मासेमारीवर कायदेशीर बंदी घातल्याने बेकायदा मासेमारीला चाप बसेल अशा विश्वास मच्छिमारांना होता. मात्र मुंबईतील मच्छिमारांचा हा विश्वास खोटा ठरला आहे. कारण या बंदीनंतरही मुंबईच्या किनारपट्ट्यांवर पर्ससीन नेटने लपून छपून मासेमारी सुरू असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे.


अत्याधुनिक तंत्राचा फटका

मुंबईसह देशभरातील किनारपट्ट्यांवर कित्येक वर्षांपासून पर्ससीन नेट आणि बुलेट नेटद्वारे मासेमारी सुरू आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केल्या जाणाऱ्या या मासेमारीचा फटका पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना बसू लागला. कारण या नेटमध्ये एकाच वेळेला मोठ्या प्रमाणावर मासे पकडले जातात. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांच्या वाटेला कमी प्रमाणात मासे येतात. त्यातच या नेटच्या वापराचा परिणाम माशांच्या पैदाशीवरही होऊ लागल्याने समुद्रातील माशांच्या प्रजाती अस्तंगत होऊ लागल्या अाहेत.



बंदीनंतरही पाठपुरावा सुरूच

या धर्तीवर पारंपारिक मच्छिमारांनी पर्ससीन मासेमारीला विरोध करत त्यावर बंदी घालण्यासाठी लढा उभा केला. त्याला फेब्रुवारी २०१६ मध्ये यश आलं आणि ही मासेमारी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली, पण प्रत्यक्षात कडक कारवाई होत नसल्याने पर्ससीन मासेमारी २०१६ नंतरीही सुरूच आहे. त्यामुळे पारंपारिक मच्छिमार सातत्याने मत्सव्यवसाय विभागाकडे पर्ससीन मासेमारीविरोधात कारवाईची मागणी करत आहेत. पण त्याकडे विभाग लक्ष देत नसल्याचा आरोप कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केला.



१० टन मासे पकडले

राज्य सरकार पाठोपाठ केंद्र सरकारने महिन्याभरापूर्वी पर्ससीन मासेमारीला बंदी घालत या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले. त्यामुळे आता तरी पर्ससीन मासेमारी बंद होईल असं वाटत होतं. पण ही मासेमारी सुरू असल्याचं नुकतंच उघड झालं आहे. तीन दिवसांपूर्वी भाऊचा धक्का येथे पर्ससीन नेटद्वारे एका मच्छिमारांने १० टन घोळ मासे पकडले. या माशांची तो विक्री करत असल्याची माहिती मच्छिमारांना मिळाल्याबरोबर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली.



बोट, नेट ताब्यात

पण, मच्छिमार पोहोचेपर्यंत साडेचार कोटी रुपयांच्या माशांची विक्री झाली होती आणि या मच्छिमाराकडे त्यावेळी फक्त ८ मासे सापडले. मच्छिमारांच्या तक्रारीनंतर मत्सव्यवसाय विभागाने १ बोट आणि नेट ताब्यात घेतलं आहे. दरम्यान कृती समितीने यासंबंधी मत्सव्यवसाय विभागाकडे लेखी तक्रार करत या गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी केली आहे. पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्याला पाचपट दंड आकारण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे त्या मच्छिमारांविरोधात लवकरात लवकर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही तांडेल यांनी केली आहे.




मुंबईकरांच्या ताटाएेवजी परदेशात

पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांचा भर घोळ मासे पकडण्यावर असल्याचं दिसून येत आहे. त्याचं कारण घोळ माशाच्या पोटात बोट नावाचा मांसल भाग असतो. त्यापासून तलम धागा तयार केला जातो. हा धागा शस्त्रक्रियांसाठी वापरला जातो. त्यामुळे घोळ माशांना परदेशात मोठी मागणी आहे. हा मासा छुप्या पद्धतीने परदेशी व्यापऱ्यांना चक्क १ ते दीड लाखांत विकला जातो. त्यामुळे हा चविष्ट घोळ मासा मुंबईकरांच्या ताटात पडण्याएेवजी परदेशात मोठ्या प्रमाणात जातो.



हेही वाचा-

पर्ससीन नेट मासेमारीवर अखेर केंद्र सरकारची बंदी

ओखी इफेक्ट: म्हावरं महागणार... पुढचे १० दिवस मासेमारी बंद


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा