Advertisement

कोरोनामुळे अर्थव्यवस्था ३० वर्षे मागे जाणार

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर 21 दिवसांचा लाॅकडाऊन घोषीत केला आहे. यामुळे देशातील सर्व उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. याचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

कोरोनामुळे अर्थव्यवस्था ३० वर्षे मागे जाणार
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर 21 दिवसांचा लाॅकडाऊन घोषीत केला आहे. यामुळे देशातील सर्व उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. याचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. यामुळे अर्थव्यवस्था ३० वर्षे मागे जाण्याचा अंदाज पतमानांकन संस्था फिचने वर्तवला आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये देशाचा जीडीपी वाढीचा दर 2 टक्के राहील, असं फिचने म्हटलं आहे. 

जीडीपी कधी नव्हे इतका खाली येईल. कोरोनामुळे आलेल्या मंदीमुळे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांचे सर्वाधिक नुकसान होणार असल्याचं फिचने म्हटलं आहे. फिचने जागतिक मंदीचे सूतोवाच केले आहे. जागतिक स्तरावर आर्थिक उलाढाल १.९ टक्क्यांनी कमी होईल. अमेरिका, युरोझोन व ब्रिटन यांचा आर्थिक विकास अनुक्रमे ३.३, ४.२ व ३.९ टक्के खाली येईल, असा अंदाज फिचने वर्तवला आहे. 

आशियाई विकास बँकेनेही चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासदर घटवून ४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.  एस अॅण्ड पी ग्लोबल रेटिंग्जनेही जीडीपी ३.५ टक्क्यांवर येईल, असं म्हटलं आहे. यापूर्वी जीडीपी ५.२ टक्के राहील, असं एस अॅण्ड पीने सांगितलं होतं. इंडिया रेटिंग्जनेही भारताचा जीडीपी ५.५ टक्क्यांवरून खाली आणत ३.६ टक्के राहील, असा अंदाज केला आहे. मूडीजने गेल्याच आठवड्यात चालू २०२० या वर्षासाठी भारताचा जीडीपी वृद्धीदर ५.३ वरून २.५ टक्के केला होता.



हेही वाचा

CISF च्या 11 जवानांना कोरोनाची लागन

मुंबई पोलिस दलातील पोलिस उपायुक्ताची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा