Advertisement

गौतम अदानी बनले आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती

यावर्षी अंबानींच्या संपत्तीमध्ये १७.५ कोटी डॉलरची घट झाली आहे. तर अदानी यांच्या संपत्तीत ३२.७ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

गौतम अदानी बनले आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती
SHARES

अदानी समूहाचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरं सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. यंदा त्यांच्या संपत्तीत जवळपास १०० टक्के वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ३३ अब्ज डॉलर्सने वाढून ६६.५ अब्ज डॉलर्स झाली आहे. ब्लूमबर्गच्या बिलिनेयर इंडेक्स अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

या अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती ७६.५ अब्ज डॉलर आहे. जगामधील श्रीमंतांच्या यादीत अंबानी १३ व्या स्थानावर आहेत. तर अदाणी १४ व्या क्रमांकावर आहेत. आशियातील ५ सर्वाधिक श्रीमंत लोकांमध्ये चीनमधील ३ तर भारतातील २ आहेत. यावर्षी अंबानींच्या संपत्तीमध्ये १७.५ कोटी डॉलरची घट झाली आहे. तर अदानी यांच्या संपत्तीत ३२.७ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अदानींच्या संपत्तीमध्ये गेल्या एका वर्षापासून मोठी वाढ झाली आहे.  मे २०२० पासून आतापर्यंत त्यांच्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे

अदानींच्या लिस्टेड ६ कंपन्यांचे मार्केट कॅप एका वर्षात ४१.२ टक्के वाढले आहे. गेल्या वर्षात अदानी टोटल गॅसचे शेअर्स ११४ पट वाढले आहेत. तर अदानी इंटरप्राइजेजचे शेअर्स ८२ पट तर अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स ६१ पट आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स ४३ पट व अदानी पावरचे शेअर १८ पटीपेक्षा जास्त वाढले आहे. 

अदानी समूह बंदर, विमानतळ, ऊर्जा, संसाधने, लॉजिस्टिक, पॅकेज्ड फूड्स, अ‍ॅग्री बिझिनेस, रिअल इस्टेट, फायनान्शिअल सर्व्हिसेस, गॅस आणि डिफेन्स या उद्योगांमध्ये आहे. 



हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 'इतक्या' दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

Tauktae Cyclone: नौदलाचे शोधकार्य अद्याप सुरूच; २६ बेपत्ता, ४९ मृतदेह 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा