Advertisement

एअर इंडियाला खरेदीदार मिळेना, आयपीओद्वारे हिस्सा विकणार?

कर्जाच्या विळख्यात अडकलेली देशातील सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियाला खरेदीदार मिळत नसल्याचं स्थिती आहे.

एअर इंडियाला खरेदीदार मिळेना, आयपीओद्वारे हिस्सा विकणार?
SHARES

कर्जाच्या विळख्यात अडकलेली देशातील सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियाला खरेदीदार मिळत नसल्याचं स्थिती आहे. केंद्र सरकारला एअर इंडियाची विक्री करायची आहे. यासाठी सरकारने दुसऱ्यांदा प्रस्ताव जाहीर केला. मात्र, एअर इंडिया खरेदी करण्यासाठी कोणीही पुढे आलेलं नाही. त्यामुळे आता शेअर बाजाराद्वारे एअर इंडियाची हिस्साविक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकते. यासाठी एअर इंडियाचा आयपीओ (प्राथमिक समभाग विक्री) आणला जाईल, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. 

एअर इंडियावर तब्बल ६० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. कंपनीकडे जवळपास १३६ विमाने आहेत. कंपनीचा कोटा ५ हजार ५०० कोटींवर गेला आहे. यामुळे एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय सरकारने आधी घेतला होता. मात्र, ७६ टक्के हिस्सा खरेदी केल्यानंतरही अधिक नफा होण्याची शक्यता नसल्याचे खरेदीदारांनी त्यात रस दाखवला नाही. त्यामुळे सरकारने १०० टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला. पण यासाठीही कोणी खरेदीदार मिळत नाही. परिणामी आता सरकार एअर इंडियाचा आयपीओ आणण्याचा विचार करत आहे. 

एअर इंडियामधील २५ हजार कोटींचा हिस्सा सरकारला विकायचा आहे. मात्र, यासाठी खरेदीदार मिळत नाही. मार्चपर्यंत खरेदीदार न आल्यास सरकार हिस्स्याची शेअर बाजाराद्वारे विक्री करेल.



हेही वाचा -

PMC घोटाळा : एचडीआयएलची मालमत्ता विकण्यास हरकत नाही - सारंग वाधवान

टाटा समूहाला झटका, सायरस मिस्त्रीच कंपनीचे अध्यक्ष!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा