Advertisement

आयटी क्षेत्रात 'या' तारखेपर्यंत करता येणार घरून काम

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे सरकारने आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याची मुदत आणखी वाढवली आहे.

आयटी क्षेत्रात 'या' तारखेपर्यंत करता येणार घरून काम
SHARES

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे सरकारने आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याची मुदत आणखी वाढवली आहे. दूरसंचार विभागाने आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना डिसेंबरपर्यंत घरातून काम म्हणजेच वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आयटी क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहेत.



सरकारने याआधी आयटी क्षेत्रात जुलैपर्यंत घरून काम करण्याची परवानगी दिली होती. दूरसंचार विभागाने मंगळवारी रात्री ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. सध्या 85 टक्के आयटी कर्मचारी घरूनच काम करत आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण काम असणारे कर्मचारीच ऑफिसमध्ये येत आहेत.


सरकारच्या या निर्णयाचं आयटी क्षेत्राकडून स्वागत करण्यात आलं आहे. विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी ट्वीट केलं आहे. ट्टिवटमध्ये त्यांनी म्हटलं की, सरकारच्या सहकार्यासाठी धन्यवाद. पहिल्या दिवसापासूनच सरकारने कामाच्या नवीन पद्धती वापरल्या आहेत. यामुळे जगभरात आमचा रिस्पॉन्सिव्हनेस वाढण्यास खूप मदत होईल.


नॅसकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष यांनीही दूरसंचार विभाग आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांचे आभार मानले आहेत. नॅसकॉमच्या आकडेवारीनुसार, टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस याप्रमाणेच काही महत्त्वाच्या आयटी कंपन्यानी त्यांच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली आहे. 



हेही वाचा - 

मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा