नौदलासाठी पाणबुड्यांसह विविध नौका तयार करणाऱ्या माझगाव डॉकमधील सरकार आपला हिस्सा आयपीओ (प्राथमिक समभाग विक्री) द्वारे विकणार आहे. हा आयपीओ लवकरच येणार आहे. आयपीओ आणण्यासाठी शेअर बाजार नियंत्रक सेबीनेही हिरवा कंदिल दिला आहे.
माझगाव डॉकमधील सरकार आपला ३५ टक्के हिस्सा विकणार आहे. आयपीओसाठी माझगाव डॉकने सेबीकडे अर्ज केला होता. २ कोटी २४ लाख १० हजार समभागांची विक्री करण्यात येणार आहे. शेअर बाजारात आयपीओच्या माध्यमातून सरकारी हिश्शाची विक्री होणार आहे. सेबीने मागील आठवड्यातच या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच कंपनी शेअर बाजारात येणार आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयांतर्गत असलेली महत्त्वाची कंपनी आहे. कंपनी नौदलासाठी विविध युद्धनौका आणि पाणबुड्या तयार करते. स्कॉर्पिअन श्रेणीतील अत्याधुनिक पाणबुड्यादेखील येथे तयार होत आहेत. कंपनीने अलिकडे अनेक कामे बाहेरील कंपन्यांना कंत्राटावर दिली.
हेही वाचा -
एअर इंडियाला खरेदीदार मिळेना, आयपीओद्वारे हिस्सा विकणार?
PMC घोटाळा : एचडीआयएलची मालमत्ता विकण्यास हरकत नाही - सारंग वाधवान