IKEA स्वीडन कंपनीचं मुंबईत ऑनलाईन स्टोअर

घरगुती सामानाची विक्री करणारी स्वीडनची प्रमुख कंपनी 'आयकीया'नं (ikea) मुंबईत ऑनलाइन स्टोअर (Online Store) सुरू केलं आहे.

SHARE

घरगुती सामानाची विक्री करणारी स्वीडनची प्रमुख कंपनी 'आयकीया'नं (ikea) मुंबईत ऑनलाइन स्टोअर (Online Store) सुरू केलं आहे. कंपनीनं सोमवरी याबाबत घोषणा केली असून, कंपनी या स्टोअरमध्ये ७ हजार ५०० उत्पादनं उपलब्ध करणार आहे. या कंपनीचं पुढील ३ वर्षांत १० कोटी ग्राहकांना आपल्याकडं आकर्षित करण्याचं उद्धिष्ट्यं आहे. तसंच, 'वाढते शहरीकरण आणि ग्राहकांच्या व्यवहारात होणारे बदल यामुळं भारताच्या किरकोळ क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जगातील पहिल्या काही बाजारपेठांमध्ये मुंबईचा समावेश आहे, जिथे आपण हा बदल करीत आहोत', असं आयकीया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पीटर बेटझेल यांनी म्हटलं.

किंमत २०० रुपयांपेक्षा कमी

या ऑनलाइन स्टोअरमध्ये १००० उत्पादनांची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी असणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतात ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन प्लॅटफॉर्मवर उत्पादनांच्या किंमतीवर काहीच फरक नसेल. भारतात आयकीयाचे ५५हून अधिक पुरवठाधारक आहेत. यामध्ये डिलेवरी करणारे ४ लाख असून, यामधील ४५ हजार जण रोजगाराच्या उद्धिष्ट्यानं जोडले गेलेले आहेत. या कंपनीच्या हैद्राबाद इथं असलेल्या पहिल्या स्टोअरमध्ये आतापर्यंत ३० लाखाहून अधिक ग्राहकांनी भेट दिल्याची माहिती मिळते.  

'अशी' होते सामानाची डिलेवरी 

कोणत्याही घरगुती सामानाची ऑर्डर केल्यावर कंपनी पुढील ४ दिवसांत समानाची डिलेवरी करते. एखादा ग्राहक आयकीया कंपनीचा मेंबर असेल तर त्याला ९० दिवसांत सामान परत पाठवता येणार आहे. मात्र, मेंबर नसल्यास ६० दिवसांत सामान पाठवता येणार आहे.हेही वाचा -

'ईडी'च्या कार्यालयावर येऊ नका, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना सूचना

गणेशोत्सव २०१९: नोंदणी नाही तर वर्गणीचा अधिकार नाही - धर्मादाय आयुक्तसंबंधित विषय
ताज्या बातम्या