Advertisement

जीडीपीत चालू आर्थिक वर्षांत १०.३ टक्क्यांची घट - आयएमएफ

रताच्या जीडीपीत चालू आर्थिक वर्षांत १०.३ टक्क्यांची घट होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने मंगळवारी अंदाज वर्तविला आहे.

जीडीपीत चालू आर्थिक वर्षांत १०.३ टक्क्यांची घट - आयएमएफ
SHARES

भारताच्या जीडीपीत चालू आर्थिक वर्षांत १०.३ टक्क्यांची घट होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने मंगळवारी अंदाज वर्तविला आहे. मात्र, त्यानंतर अर्थव्यवस्था उसळी घेईल आणि  २०२१-२२ या आर्थिक वर्षांत ती ८.८ टक्के विकास दर असेल असंही आयएमएफने म्हटलं आहे. 

आयएमएफ आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त वार्षिक बैठकीआधी अहवाल जारी करण्यात आला आहे. जागतिक अर्थव्यवस्था चालू वर्षांत ४.४ टक्क्यांनी घसरेल, तर २०२१ मध्ये ५.२ टक्क्यांनी जागतिक अर्थव्यवस्था उसळी घेईल, असं या अहवालात म्हटलं आहे. चालू वर्षांत, १.९ टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदविणारी प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये चीनची एकमेव अर्थव्यवस्था असेल. अमेरिकेची अर्थव्यवस्था २०२० मध्ये ५.८ टक्क्यांनी गडगडेल, तर पुढील वर्षांत ३.९ टक्क्यांची वाढ नोंदवेल, असंही आयएमएफने म्हटलं आहे. 

 अहवालानुसार, २०१९  मध्ये भारताचा जीडीपी विकास दर ४.२ टक्के होता. गेल्याच आठवड्यात आयएमएफने म्हटले की या आर्थिक वर्षात भारताची जीडीपी ९.६ टक्क्यांनी घसरू शकेल. सध्या भारताची परिस्थिती खूपच वाईट आहे, जी आपण यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.



हेही वाचा -

NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा