Advertisement

उशीरा आयटीआर भरणाऱ्यांना मिळणार केवळ एकच संधी

आता उशीरा आयटीआर भरण्यासाठी केवळ एकच संधी दिली जाणार आहे. करदात्यांना सध्या उशीरा आयटीआर भरण्यासाठी दोन संधी दिल्या जातात.

SHARES

केंद्र सरकारने प्राप्तिकर रिटर्न (इन्कम टॅक्स रिटर्न- आयटीआर) भरण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता उशीरा आयटीआर भरण्यासाठी केवळ एकच संधी दिली जाणार आहे. केंद्र सरकारने आर्थिक विधेयक २०२१ च्या कायद्यात बदल करुन नवीन नियम लागू केले आहेत. नवीन नियमांची अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ पासून करण्यात येणार आहे.

करदात्यांना सध्या उशीरा आयटीआर भरण्यासाठी दोन संधी दिल्या जातात. ज्या वर्षाचे आयटीआर आहे त्या आर्थिक वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत आयटीआर भरल्यास  कोणतीच फी भरावी लागत नाही. मात्र, पुढील आर्थिक वर्षीच्या डिसेंबरपर्यंत आयटीआर भरल्यास पाच हजार रुपये फी  भरावी लागते. जर यापेक्षा जास्त उशीर झाल्यास मार्चपर्यंत १० हजार रुपये फी भरुन आयटीआर भरता येऊ शकतो.

१ एप्रिलपासून करदात्यांना मागील वर्षीचा आयटीआर मार्च अखेरपर्यंत भरण्याची संधी आता मिळणार नाही. करदात्यांना फक्त ५ हजार रुपये उशीरा फी भरुन डिसेंबरपर्यंत आयटीआर भरता येणार आहे. यामध्ये १० हजार रुपये फी भरून आयटीआर भरण्यासाठी आणखी एक संधी दिला जाणारा पर्याय सरकारने समाप्त केला आहे. मात्र, ज्यांचं वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयापर्यंत आहे अशा व्यक्तींना १ हजार रुपये उशीरा फी भरण्याचे पर्याय सुरु राहणार आहे.



हेही वाचा -

  1. ३१ मार्चपर्यंत करा 'ही' १० महत्वाची कामं, अन्यथा खिशाला पडेल मोठा भुर्दंड

  1. १ एप्रिलपासून पोस्ट ऑफिस बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी शुल्क


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा