Advertisement

मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवलं

मुंबईत बीकेसीमध्ये होणारं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससी केंद्र सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवलं
SHARES

मुंबईत बीकेसीमध्ये होणारं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससी केंद्र सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने याबाबतची अधिसूचना काढली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होण्याचं स्वप्न मोदी सरकारने गुंडाळलं आहे. 

यापुढे सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा या गांधीनगरमधील आर्थिक सेवा केंद्रामार्फत चालणार आहेत. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी आकारास येत आहे. आयएफएससीचं मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करण्याचा हा डाव आहे .पंतप्रधानांनी आपल्या राज्याच्या पलिकडे जाऊन राष्ट्रीय विचार करायचा असतो. त्यामुळे मुंबईला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय केंद्राचा दर्जा देण्यासाठी केद्राने विचार करावा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

आयएफएससीच्या मुख्यालयासाठी मुंबईतील बीकेसीमध्ये राखीव ठेवलेली जागा केंद्र सरकारने राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारला बुलेट ट्रेनसाठी देण्यास सांगितलं होतं. त्याचवेळी खरं तर मुंबईचं जगाचं आर्थिक केंद्र होण्याच्या स्वप्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.  केंद्राच्या अधिसूचनेनुसार, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरणची स्थापना 27 एप्रिल 2020 ला केली आहे. या प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय गांधीनगर, गुजरात येथे असेल.  हेही वाचा -

रिलायन्स जिओला चौथ्या तिमाहीत जबरदस्त नफा

5G साठी एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटींचा करार
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा