Advertisement

5G साठी एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटींचा करार

भारती एअरटेलने नेटवर्क क्षमता आणि ग्राहकांच्या सुविधेसाठी हा करार केला आहे.

5G साठी एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटींचा करार
SHARES

दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने 5 जी नेटवर्क तयार करण्यासाठी दूरसंचार उपकरणे बनवणारी प्रमुख कंपनी नोकियाला  ७५०० कोटी रुपयांचं कंत्राट दिले आहे. या कराराअंतर्गत नोकिया 4 जी सेवांसाठी तीन लाख बेस स्टेशन तयार करेल. जी पुढच्या पिढीच्या सेवांसाठी स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर 5 जी नेटवर्कमध्ये अपग्रेड केली जाईल. 

भारती एअरटेलने नेटवर्क क्षमता आणि ग्राहकांच्या सुविधेसाठी हा करार केला आहे. एअरटेलने या ९ दूरसंचार सर्कलमध्ये नोकियाच्या सिंगल रेडिओ एक्सेस नेटवर्क (एसआरएएन) तंत्रज्ञानासाठी काही वर्षांचा करार करण्याची घोषणा केली आहे. एअरटेलने म्हटले की, या अंतर्गत एअरटेलकडून या ९ सर्कलमध्ये सुमारे ३ लाख रेडिओ नेटवर्क उपकरण लावले जातील. हा या वर्षीचा पहिला नेटवर्क विस्तार करार असेल.  आम्ही ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी अनेक नव्या तंत्रज्ञानाची सातत्याने गुंतवणूक करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. नोकियाबरोबरचे हे पाऊल याच दिशेनने एक मोठे पाऊल आहे.

या देशांमध्ये 5 जी सेवा

अमेरिकेतील काही ठिकाणी ही सेवा सुरु झाली आहे. त्याचबरोबर काही यूरोपीयन देशांचाही यात समावेश आहे. यामध्ये स्वित्झर्लंड, फिनलँड आणि ब्रिटनचा समावेश आहे. त्याचबरोबर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, स्पेन, स्वीडन, कतार आणि यूएईमध्येही 5 जी सेवा सुरु करण्याची अधिकृत घोषणा झालेली आहे. 

4 जी आणि 5 जी तील फरक

5 जी तंत्रज्ञान हे 4 जी तंत्रज्ञानापेक्षा वेगळे असेल. हे सर्व काही दूरसंचार कंपनीच्या गुंतवणूक आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर अवलंबून असते. सध्या 4 जी वर सर्वाधिक ४५ एमबीपीएसचा वेग शक्य आहे आणि एक चिप उत्पादक कंपनीच्या मते 5 जी तंत्रज्ञान यापेक्षा १० ते २० टक्के अधिक वेग देऊ शकेल.



सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचं निधन

मुंबईत कोरोनानं घेतला आणखी २५ जणांचा बळी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा