Advertisement

कोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटी नोकऱ्यांवर गदा

कोरोनामुळे बहुतांशी देशात लाॅकडाऊमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. याचा मोठा फटका सर्वांनाच बसला आहे.

कोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटी नोकऱ्यांवर गदा
SHARES

कोरोनामुळे बहुतांशी देशात लाॅकडाऊमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. याचा मोठा फटका सर्वांनाच बसला आहे. कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा अंदाज आता संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने वर्तवला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात  ३०.५ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हटलं आहे. यापूर्वी या संघटनेने प्रत्येक आठवड्यातील ४८ तासांची पूर्णकालिक नोकरी असलेल्या १९.५ कोटी लोकांच्या  नोकऱ्या जाणार असल्याचं म्हटले आहं.

जगभरात कोरोनाचा फैलाव वाढल्याने लॉकडाऊन वाढवला जाणार आहे. त्यामुळे या संघटनेला पुन्हा एकदा आपल्या अहवालात बदल करावा लागला आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं म्हटलं की, कोरोनामुळे अनौपचारिक क्षेत्रातील १.६ अब्ज कामगारांसमोर संकट उभे राहिले आहे. कारण यामुळे कमावण्याचे साधन बंद झालेले आहे. 

भारतात कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचा दर वाढून २३.४ वर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (सीएमआयईच्या) अहवालानुसार, लॉकडाऊनमुळे भारताच्या शहरी बेरोजगारीचा दर ३०.९ टक्के पर्यंत वाढू शकतो. तर एकूण बेरोजगारी २३.४ टक्केपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या अहवालावरुन स्पष्ट होते की, कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर अत्यंत वाईट होणार आहे.

सीएमआयईईच्या अंदाजानुसार, बेरोजगारी दर मार्च महिन्याच्या मध्यास ८.१ टक्क्यांवरुन २३ टक्के झाला आहे.  शहरी क्षेत्रात बेरोजगारीचा दर १५ मार्च २०२० ला ८.२१ टक्के होता. तर २२ मार्च २०२० ला तो ८.६६ टक्केवर आला. त्यानंतर २४ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर यामध्ये वाढ झाली. २९ मार्च २०२० ला हा ३०.०१ टक्क्यांवर पोहोचला. ५ एप्रिल २०२० च्या आकडेवारीनुसार हा ३०.९३ टक्क्यांवर आला. 



हेही वाचा   -
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन

मुंबई महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनानं मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा