Advertisement

गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

तेल कंपन्या दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किंमता आढावा घेऊन आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशातील दरांनुसार गॅस सिलिंडरचे दर निश्चित करतात.

गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला
SHARES

एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये तेल कंपन्यांनी मोठी वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढवण्यात आली आहे.  तर पाच किलोच्या गॅसच्या किंमती १८ रुपयांनी वाढवल्या आहेत. याशिवाय १९ किलो सिलिंडरही ३६.५० रुपयांनी महागलार आहे.

तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार, आता दिल्लीमध्ये १४.२ किलोचा गॅस सिलिंडर ६४४ रुपयांना, कोलकातामध्ये ६७०.५० रुपयांना, मुंबईत ६४४ रुपयांना आणि चेन्नईमध्ये ६६० रुपयांना मिळणार आहे. 

दरवाढ होण्याआधी दिल्लीत १४.२ किलो गॅस सिलिंडरचे दर ५९४ रुपये इतके होते. कोलकात्यात ६२०.५० रुपये, तर मुंबईमध्ये ५९४ रुपयांना गॅस सिलिंडर मिळत होता. मात्र आता यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

तेल कंपन्या दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किंमता आढावा घेऊन आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशातील दरांनुसार गॅस सिलिंडरचे दर निश्चित करतात.  ग्राहकांना https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर गॅसच्या किंमती जाणून घेता येतात. येथे आपल्या शहराचे नाव सिलेक्ट करुन शहरातील गॅसचे दर जाणून घेता येतील.



हेही वाचा -

कोरोना चाचणी आता ७८० रुपयात

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा