Advertisement

'हॉटेल उद्योगाच्या परवान्यांची संख्या कमी करा'


'हॉटेल उद्योगाच्या परवान्यांची संख्या कमी करा'
SHARES

एकट्या मुंबईत हॉटेल उद्योगातून दरवर्षी 35 हजार कोटींची उलाढाल होते. या माध्यमातून ५ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. हॉटेलसाठी परवाना घेताना विविध विभागांशी संबंध येतो. त्यामुळे परवान्यांसाठी एकच संस्था हवी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली.

हॉटेल उद्योगाला लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्याबरोबर त्यामध्ये सुलभता आणावी. मुंबईसारख्या ठिकाणी 'फूड ट्रॅक' सुरू करण्यासाठी विशेष धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. 'नॅशनल रेस्टॉरंट ऑफ इंडिया'च्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या.

मुंबई महापालिकेने यासंदर्भात परवान्यांची संख्या कमी करण्यासाठी पावले उचलली असून, जवळपास २९ प्रकारच्या परवानग्या कमी करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

'फूड ट्रॅक' ही उत्तम संकल्पना असून, कार्यालये, पर्यटनस्थळे याठिकाणी गरमागरम खाद्यपदार्थ मिळू शकतील. याकामी स्वयंसहायता बचत गटांना देखील फायदा मिळू शकतो. 'फूड ट्रॅक'साठी विशेष धोरण तयार करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी हॉटेल व्यवसायाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता आदी उपस्थित होते.


हेही वाचा -

एसी-नॉन एसी हॉटेलला सरसकट 12 टक्के जीएसटी?

हॉटेल विनयची 'विनम्रता', 'मेन्यूकार्ड' केले स्वस्त!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा