Advertisement

व्याजदरात बदल नाही, रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर

तीन दिवसांच्या आढावा बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बुधवारी पतधोरण जाहीर केलं आहे. यामध्ये रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय आयबीआयने घेतला आहे.

व्याजदरात बदल नाही, रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर
SHARES

देशात कोरोनाचं संकट आता अधिक गहिरं होत चाललं आहे. तसंच महागाई दरही वाढत चालला आहे. या दोन्ही कारणांमुळे रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ करण्याचं टाळलं आहे. व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय आरबीआयने पतधोरणात घेतला आहे. 

तीन दिवसांच्या आढावा बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बुधवारी पतधोरण जाहीर केलं आहे. यामध्ये रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय आयबीआयने घेतला आहे. रेपो रेटमध्ये वाढ न झाल्यामुळे कर्जदारांवरील ईएमआयचा भार वाढला नाही. तर रेपो रेट कमी न झाल्याने दिलासाही मिळालेला नाही.

पतधोरण आढावा समितीनं रेपो रेट ४ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. त्याचबरोबर रिव्हर्स रेपो रेटही ३.३५ टक्केच राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे अर्थव्यवस्थेसमोर पुन्हा आव्हान उभं राहणार आहे. मात्र,  राहण्याची चिन्हं आहेत.  आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी १०.५ राहणार असल्याचा अंदाज आयबीआयने पतधोरणात व्यक्त केला आहे. मागच्या पतधोरणातही आढावा समितीने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये बदल केला नव्हता. 



हेही वाचा -

अबब! मुंबईतील घर विकलं गेलं तब्बल १ हजार कोटींना

एसबीआयचं गृहकर्ज महागलं, व्याजदरात 'इतकी' वाढ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा