Advertisement

आरबीआयकडून व्याजदरात कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची ) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

आरबीआयकडून व्याजदरात कोणताही बदल नाही
SHARES
रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेट  ४ टक्क्यांवर कायम राहणार आहे. तर रिव्हर्स रेपो रेट देखील ३.३५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची ) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपीमध्ये ९.५ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यताही यावेळी , शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे.  आगामी काळातही महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक राहणार असून कोरोना संकटामुळे मागणीदेखील कमीच राहण्याची भीती रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे.याआधी २८ सप्टेंबर रोजी पतधोरण समितीची नियोजित बैठक होणार होती. परंतु चारपेक्षा कमी गणसंख्या असल्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली होती. सहा सदस्यीय पतधोरण समितीने ३१ मार्च २०२१ पर्यंत वार्षिक चलनवाढ ४ टक्क्यांपर्यंत आटोक्यात ठेवण्याचा निर्णय मागेच घेतला आहे. चलनवाढीसाठी कमाल पातळी ६ टक्के तर किमान पातळी २ टक्के निर्धारित करण्यात आली आहे.  डिसेंबर २०२० पासून ग्राहकांना कोणत्याही वेळी आरटीजीएस सुविधेचाही वापर करता येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली. 

हेही वाचा- 

अनलॉकच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत वाढ

स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी दिनेश खारा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा