Advertisement

सणासुदीच्या दिवसात कर्ज महागणार नाही; अारबीअायने ठेवले रेपो दर स्थिर

रुपया सावरण्यासाठी अाणि महागाई अाटोक्यात ठेवण्यासाठी अारबीअायकडून रेपो दरात पाव टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अारबीअायने व्याजदर वाढवण्याचं टाळलं अाहे.

सणासुदीच्या दिवसात कर्ज महागणार नाही; अारबीअायने ठेवले रेपो दर स्थिर
SHARES

कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे महागाई वाढण्याची शक्यता अाणि रुपयात होत असलेली घसरण यामुळे रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या अाढावा पतधोरणात रेपो दर कायम ठेवून अारबीअायने सर्वसामान्यांना दिलासा दिला अाहे. रेपो दर अाता ६.५० टक्क्यांवर कायम अाहे. त्यामुळे अागामी सणासुदीच्या दिवसात बँकांचं कर्ज महागार नाही.

रिव्हर्स रेपोही कायम

अारबीअायने रिव्हर्स रेपो दरातही काहीच बदल केला नाही. अाॅगस्ट महिन्यात महागाई दर ३.६९ टक्के राहिला अाहे. अारबीअायच्या ४ टक्क्याच्या लक्ष्याच्या हा दर कमी अाहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून अांतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत अाहे. त्यामुळे देशात पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत अाहेत. परिणाम महागाई भडकण्याची चिन्हं अाहेत. याशिवाय डाॅलरच्या तुलनेत रुपयामध्ये विक्रमी घसरण सुरू अाहे. रुपया सावरण्यासाठी अाणि महागाई अाटोक्यात ठेवण्यासाठी अारबीअायकडून रेपो दरात पाव टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अारबीअायने व्याजदर वाढवण्याचं टाळलं अाहे. 

दोनदा वाढ

मागील दोन अाढावा पतधोरण बैठकीत अारबीअायने रेपो दरात वाढ केली होती. अारबीअायने साडेचार वर्षांनंतर या वर्षी जूनममध्ये रेपो दर ०.२५ टक्के वाढवून कर्जे महाग केली होती. त्यानंतर अाॅगस्ट महिन्यात पुन्हा रेपो दर ०.२५ टक्के वाढवला होता.


काय अाहे रेपो?

रिझर्व्ह बँक देशातील बँकांना कर्ज देत असते. या कर्जावर रिझर्व्ह बँक अाकारत असलेला व्याजदर म्हणजे रेपो दर. रेपो दर वाढवल्यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणारं कर्ज महाग होतं. त्यामुळे याचा भार बँका अापल्या ग्राहकांवर टाकतात. बँकांही अापले कर्जावरील व्याजदर वाढवतात. परिणामी बँकांच्या गृह, वाहन अाणि वैयक्तिक कर्जाचा व्याजदर वाढतो.



हेही वाचा -

कोचर यांच्या राजीनाम्याने गुंतवणूकदारांचा ११ हजार कोटींचा फायदा

बँक ऑफ महाराष्ट्रच्या 51 शाखा होणार बंद




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा