जिओ धारकांसाठी वाईट बातमी, 'ही' सेवा केली बंद

'ही' सेवा खरेदी केलेल्या ग्राहकांना आता टॅरिफ प्लॅन निवडण्यास सांगण्यात आले आहेत. तसं न केल्यास भविष्यात त्यांची सेवा खंडीत केली जाऊ शकते.

SHARE

रिलायंस जिओनं रविवारी टेरिफ प्लॅनमध्ये दरवाढीची घोषणा केल्यानंतर आता रिलायंस जिओ फायबरच्या दरामध्येही वाढ केली आहे. जिओच्या युजर्सना आता 'फ्री ब्रॉडबँड'ची सेवा मिळणार नाही. या सेवेसाठीदेखील आता पैसे मोजावे लागणार आहेत.

जिओ फायबर सेवा खरेदी केलेल्या ग्राहकांना आता टॅरिफ प्लॅन निवडण्यास सांगण्यात आले आहेत. तसं न केल्यास भविष्यात त्यांची सेवा खंडीत केली जाऊ शकते. येत्या काही आठवड्यात देशभरात रिलायंस जिओ फायबरसाठी कमर्शिअल बिलिंग सेवा सुरू केली जाणार आहे. सध्या देशातील सुमारे ५ लाख जिओ फायबर युजर्सना टॅरिफ प्लॅनमध्ये शिफ्ट केलं जाणार आहे. तसंच ट्रायल सेवा वापरणाऱ्यांनादेखील मोफत सेवा देण्याऐवजी टॅरिफ प्लॅन्स दिले जातील

रिलायन्स जिओ फायबर ब्रॉडबॅन्डमध्ये किमान ६९९ ते ८४९९ रूपये याधील प्लॅन्स बनवण्यात आले आहेत. तर स्पीड किमान १००Mbps ते १Gbps आहे. जिओ फायबर ही ब्रॉडबँड सेवा ५ सप्टेंबर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिओ फायबर ही ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्रॉडबँड सेवा आहे.


हेही वाचा

१ डिसेंबरपासून मोबाइल इंटरनेट महागणार

बंद मोबाइल क्रमांकाची माहिती द्या; दूरसंचार कंपन्यांना ट्रायचे निर्देश

संबंधित विषय
ताज्या बातम्या