घरगुती सिलेंडरच्या किंमतीत घट

देशातील एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी या तेल मार्केटिंग कंपन्यांनी सबसिडी नसणाऱ्या एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या आहेत.

घरगुती सिलेंडरच्या किंमतीत घट
SHARES

देशातील एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी या तेल मार्केटिंग कंपन्यांनी सबसिडी नसणाऱ्या एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या आहेत.  14.2 किलोचे सबसिडी नसणाऱ्या सिलेंडरच्या किंमती मुंबईमध्ये 62 रुपयांनी कमी झाल्या आहेत. या सिलेंडरचा दर आता 714 रुपये झाला आहे. सरकारने 31 मार्च रोजी देशामधील उत्पादित नॅचरल गॅस च्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या किंमतीमध्ये 26 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

नॅचरल गॅसच्या किंमतीमध्ये कपात केल्यामुळे सीएनजी, पाईपलाइनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचणारा गॅस यांच्या सुद्धा किंमती कमी होतील. किमती कमी झाल्यामुळे ओएनजीसी सारख्या उत्पादन कंपन्यांच्या महसूलामध्ये मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. आयओसीच्या वेबसाइटवर दिलेल्या किंमतींप्रमाणे 14.2 किलोचे सबसिडी नसणाऱ्या एएनपीजी सिलेंडरच्या किंमती मुंबईमध्ये 62 रुपयांनी कमी होत 714 रुपयांवर तर 19 किलो घरगुती सिलेंडरची मुंबईतील किंमत 1234.50 रुपये झाली आहे.

इतर मेट्रो शहरांमधील किंमती

दिल्ली: 14.2 किलो-744.50 रु. आणि 19 किलो- 1285.50 रु.

कोलकाता: 14.2 किलो-774.50 रु. आणि 19 किलो- 1348.50 रु.

चेन्नई: 14.2 किलो-761.50 रु. आणि 19 किलो- 1402 रु.हेही वाचा -

महापालिकेकडून मुंबईतील 'इतकी' ठिकाणं सील

उपचारादरम्यान जसलोक रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण
संबंधित विषय