जुन्या नोटा द्या आणि दुचाकी घेऊन जा..!


SHARE

मुलुंड - पाचशे आणि हजाराची नोट सरकारनं बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर मुलुंड पूर्वेकडील पाम एकर्स जवळच्या वरदायिनी ऑटोमध्ये जुन्या नोटा घेऊन नवी कोरी दुचाकी घेऊन जा अशी स्कीम सुरू आहे. केंद्र सरकारनं जुन्या नोटा वापरून व्यवहारास फक्त पेट्रोल पंप, इस्पितळे, रेल्वे, विमानतळ आणि औषधांच्या दुकानांतच, तेही ठराविक कालावधीतच परवानगी दिली आहे. मात्र येथे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. यामधून काळा पैसा असलेल्यांना मदत तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. वरदायिनीकडून याबाबत अनेकांना मेसेज पाठवून या स्कीमची माहिती देण्यात आली. यासंदर्भात विचारणा केली असता वरदायिनी ऑटोचे मालक विक्रम कदम यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या