Advertisement

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर घटले

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यामुळे देशात पेट्रोलियम कंपन्यांनी दर कमी करून ग्राहकांना थोडाफार दिलासा दिला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर घटले
SHARES

पेट्रोल आणि डिझेल सलग दुसऱ्या स्वस्त झालं आहे. पेट्रोलचा दर १६ पैशांनी तर डिझेलचा दर १४ पैशांनी कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यामुळे देशात पेट्रोलियम कंपन्यांनी दर कमी करून ग्राहकांना थोडाफार दिलासा दिला आहे.

सध्या मुंबईत पेट्रोलचा दर ९६ रुपये ८३ पैसे तर डिझेलचा दर ८७ रुपये ८१ पैसे आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर ९० रुपये ४० पैसे आणि डिझेलचा दर ८० रुपये ७३ पैसे आहे. मागील तीन आठवड्यांत चौथ्यांदा पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले आहेत.

गुरुवारी पेट्रोल १४ पैशांनी तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त झालं होतं. पेट्रोल आणि डिझेलच्या भावानं गेल्या काही आठवड्यांपासून सामान्यांना दिलासा देण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे. पेट्रोलनं शंभरी आणि डिझेलनं नव्वदी पार केल्यामुळं सामान्यांचं बजेट कोलमडलं होतं. आता हळूहळू पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात व्हायला सुरुवात झाली आहे.



हेही वाचा

जसलोक आता कोविड रुग्णालय; महापालिकेचा निर्णय

उपनगरीय रेल्वतून सर्वसामान्यही करू शकतात प्रवास

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा