Advertisement

निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

राज्यात पेट्रोलचे सर्वाधिक दर परभणीत आहेत. परभणीत पेट्रोल प्रति लिटर ९९.३४ रुपयांवर गेलं आहे.

निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलचे दर वाढले
SHARES

देशातील पाच राज्यातील निवडणुका संपताच पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोल १५ पैशांनी तर डिझेल १८ पैशांनी महाग झालं आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लिटर ९६.९५ रुपये झाला  आहे. राज्यात पेट्रोलचे सर्वाधिक दर परभणीत आहेत. परभणीत पेट्रोल  प्रति लिटर ९९.३४ रुपयांवर गेलं आहे. 

विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशात इंधनाच्या किंमतीने शंभरी पार केली आहे.  दिल्लीत पेट्रोल ९०.५५ रुपये तर डिझेल ८०.९१ रुपये प्रतिलिटरवर पोचले आहे.  १८ दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.  यावर्षी, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जानेवारीत १० पट तर फेब्रुवारीमध्ये १६ पटीने वाढल्या होत्या. मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर ३ वेळा कमी झाले होते.  तर एप्रिलमध्ये १ वेळा बदल झाला होता. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २७ फेब्रुवारी रोजी वाढ करण्यात आली होती.

मागील  दोन महिन्यांपासून देशातील पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका सुरु होत्या. कच्चे तेल महाग झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली नव्हती. तर कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर चार आठवड्यात कमी करण्यात आले होते. मात्र, आता निवडणुका संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू लागल्या आहेत.हेही वाचा -

  1. मुंबईतील बेघरांचंही लसीकरण करणार- महापौर

  1. आता Whatsapp वर मिळवा लसीकरण केंद्रांची माहिती, जाणून घ्या प्रक्रिया
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा