Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा कपात

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या पुन्हा कमी केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा कपात
SHARES

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या पुन्हा कमी केल्या आहेत.  त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. मंगळवारी पेट्रोल प्रतिलिटर २२ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी स्वस्त झालं आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत ९६.९८ रुपये एवढी आहे, तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ८७.९६ रुपये इतकी आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर ९०.५६ रुपये तर डिझेलचा दर ८०.८७ रुपये आहे.

यापूर्वी २४ आणि २५ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं. ३७ पैशांनी स्वस्त झालं आहे. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होत असतो. इंधनाचे नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. १० फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर ४ ते ५ रुपयांची वाढ झाली होती. 

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP ९२२३११२२२२  आणि एचपीसीएल ग्राहक यांना ९२२२२०११२२  संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.



हेही वाचा -

  1. ३१ मार्चपर्यंत करा 'ही' १० महत्वाची कामं, अन्यथा खिशाला पडेल मोठा भुर्दंड

  1. १ एप्रिलपासून पोस्ट ऑफिस बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी शुल्क


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा