पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. मुंबईत २२ पैशांनी, कोलकातामध्ये २४, आणि चेन्नईत २२, आणि दिल्लीत २५ पैशांनी पेट्रेल महाग झाले आहे.
मंगळवारी पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची वाढ झाली होती. दिल्लीत पेट्रोल ३५ पैशांनी, मुंबईत ३४, कोलकात्यात ३४ तर चेन्नईत पेट्रोलचे भाव ३१ पैशांनी वाढले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले.
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, बुधवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रतिलिटर ९२.८६ रुपयांवर गेला आहे. तर डिझेलचा दर प्रतिलिटर ८३.३० रुपये झाला आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ८७.६९ रुपये, चेन्नईमध्ये ८८.८२ रुपये, तर दिल्लीत ८६.७० रुपये झाला आहे. तर दिल्लीत डिझेल ७६.४८ रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. कोलकातामध्ये डिझेलचा भाव ८०.०८ रुपये आणि चेन्नईमध्ये ८१.७१ रुपयांवर पोहोचला आहे.
जागतिक बाजारात क्रूड आॅइलचे दर वाढल्याचं कारण देत पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. २०२१ च्या पहिल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलमध्ये नऊ वेळा दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल सरासरी २.२५ रुपयांनी महागले आहे. जागतिक बाजारात क्रूड आॅइलचा भाव ५२.५१ डाॅलर प्रती बॅरल आहे. तर ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ५५.५७ डाॅलर आहे.
प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर
दिल्ली : ८६.३० रुपये प्रतिलिटर
मुंबई : ९२.८६ रुपये प्रतिलिटर
कोलकाता : ८७.६९ रुपये प्रतिलिटर
चेन्नई : ८८.८२ रुपये प्रतिलिटर
खासगी रुग्णालयांना महापालिका लसीकरण केंद्रे घोषित करण्याची शक्यता
प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय