Advertisement

HDFC बँकेच्या डिजिटल सेवा RBI नं थांबवल्या

HDFC बँकेच्या डिजिटल सेवा थांबवण्याचे आदेश केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) दिले आहेत.

HDFC बँकेच्या डिजिटल सेवा RBI नं थांबवल्या
SHARES

HDFC बँकेच्या डिजिटल सेवा थांबवण्याचे आदेश केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) दिले आहेत. बँकेच्या Digital 2.0 या उपक्रमाअंतर्गत असणाऱ्या सुविधा आणि ग्राहकांसाठी नवीन कार्ड्स लाँच करण्याच्या सेवा थांबवण्याचं आदेश दिले आहेत. यामध्ये नवीन क्रेडिट कार्ड लाँच करण्यावरही बंदी आणली आहे.

गेल्या 2 वर्षांपासून बँकेला इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि पेमेंट युटिलिटी सेवांमध्ये अनेक समस्यांचा (multiple outages) सामना करावा लागत आहे, परिणामी आरबीआयनं हा निर्णय घेतला आहे.

गेल्या २ वर्षातील ही तिसरी वेळ आहे, जेव्हा HDFC बँकेवर कोणत्या प्रकारचे निर्बंध आणण्यात आले आहेत. आरबीआयनं यावेळी डिजिटल सेवा अस्थायी स्वरुपात थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही निर्बंध आहेत. त्याचबरोबर आरबीआयनं असंही म्हटलं आहे की, या खाजगी बँकेच्या बोर्डानं त्रुटी दूर करत जबाबदारी निश्चित केली पाहिजे.

'आरबीआयनं ठरवल्याप्रमाणे, प्रमुख गंभीर निरीक्षणाचे समाधानकारक अनुपालन केल्यास वरील उपायांवर विचार केला जाईल,' असंही त्यात नमूद केलं आहे. HDFC बँकेनीही याबाबात स्पष्ट केलं आहे की, आरबीआयच्या आवश्यकतेनुसार बँकेनं अनुपालन केल्यानंतर हे निर्बंध हटवले जातील.


हेही वाचा

लक्ष्मी विलास बँक - डीबीएस विलीनीकरण स्थगितीस न्यायालयाचा नकार

देश मंदीच्या खाईत, सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपी शुन्याच्या खाली

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा