Advertisement

बँक ऑफ बडोदानेही लपवली थकीत कर्जे

रिझर्व्ह बँकेच्या तपासानुसार, रिझर्व्ह बँकेचा थकीत कर्जाबाबतचा अंदाज आणि बँक आॅफ बडोदाचे लेखा परीक्षण यात फरक दिसून आला आहे.

बँक ऑफ बडोदानेही लपवली थकीत कर्जे
SHARES

माझगाव डॉकचा आयपीओ लवकरच, ३५ टक्के हिस्सा सरकार विकणारएसबीआयपाठोपाठ आता बँक आॅफ बडोदामधीलही थकीत कर्जाचा घोटाळा समोर आली आहे. बँक आॅफ बडोदाने ५२५० कोटी रुपयांची कर्जे ताळेबंदात दाखवली नसल्याचं कबूल रेलं आहे.  बँक आॅफ बडोदाने ५२५० कोटींची थकीत कर्जे कमी दाखवण्यात आल्याचं शेअर बाजाराला कळवलं आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या तपासानुसार, रिझर्व्ह बँकेचा थकीत कर्जाबाबतचा अंदाज आणि बँक आॅफ बडोदाचे लेखा परीक्षण यात फरक दिसून आला आहे.  बँक आॅफ बडोदाला ३१ मार्चअखेर ८३३९ कोटींचा तोटा झाला होता. त्यावेळी बँकेची थकीत कर्जे ७५१७४ कोटींवर होती. निव्वळ थकीत कर्जे २३७९५ कोटींवर होती. मात्र रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार निव्वळ थकीत कर्जे २९०४५ कोटी आहेत.

काही दिवसांपूर्वीच एसबीआयनेही थकीत कर्जे लपवल्याचं समोर आलं होतं.  मागील वर्षात एकूण थकीत कर्जांपैकी १२ हजार कोटी रुपयांची थकीत कमाझगाव डॉकचा आयपीओ लवकरच, ३५ टक्के हिस्सा सरकार विकणारर्जे एसबीआयच्या ताळेबंदातून गायब झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आलं होतं. रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासानुसार एसबीआयची एकूण १ लाख ८४ हजार ६८२ कोटी रुपयांची थकीत कर्जे होती. मात्र, बँकेने २०१८-१९ या वर्षी १ लाख ७२ हजार ७५० कोटी रुपयांची थकीत कर्जे असल्याचं घोषित केलं.

बँकेची निव्वळ थकीत कर्जे ७७ हजार ८२७ कोटींची आहेत. मात्र,  लेखा परीक्षण अहवालात बँकेने ६५ हजार ८९५ कोटींची दाखवली आहेत. त्यामुळे यामुळे एकूण कर्जे आणि जाहीर केलेली थकीत कर्जे यामध्ये ११ हजार ९३२ कोटींची तफावत असल्याचं समोर आलं आहे. ही थकीत कर्जे कुठे गायब करण्यात आली असा प्रश्न निर्माण झाला आहे.



हेही वाचा -


माझगाव डॉकचा आयपीओ लवकरच, ३५ टक्के हिस्सा सरकार विकणार


एअर इंडियाला खरेदीदार मिळेना, आयपीओद्वारे हिस्सा विकणार?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा