Advertisement

भारतीय नौदलात ३५० जागांसाठी भरती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२१ आहे.

भारतीय नौदलात ३५० जागांसाठी भरती
SHARES

भारतीय नौदलात सेलर पदाच्या ३५० जादा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : ३५०

पदाचे नावनाविक (MR)

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

उंची – किमान 157 सेमी.
शारीरिक फिटनेस चाचणी (PET) – 7 मिनिटात,1.6 किमी धावूणे, 20 स्क्वॅट अप (उथक बैठक) आणि 10 पुश-अप.

पगार (PayScale) :

सुरुवातीच्या प्रशिक्षण कालावधीत रु. १४.६००/- दरमहा दिले जाईल. प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर त्यांना संरक्षण पे मॅट्रिक्स ( २१,७०० ते ६९,१०० हजार रुपये) च्या लेव्हल 3 मध्ये ठेवले जाईल. याव्यतिरिक्त, त्यांना दरमहा ५२०० / – डीए (लागू म्हणून) दिलं जाईल

वयोमर्यादा : जन्म 01 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन (Online)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 19 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जुलै 2021

भारतीय नौदलासाठी निवड प्रक्रिया?

– निवड लेखी चाचणी आणि शारीरिक फिटनेस टेस्ट (पीएफटी) च्या आधारे केली जाईल.

परीक्षा नमुना :

– प्रश्नपत्रिका द्विभाषिक म्हणजेच हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल.
– प्रश्नपत्रिकेमध्ये विज्ञान आणि गणित व सामान्य ज्ञान असे दोन विभाग असतील.
– प्रश्नपत्रिकेचे प्रमाण दहावीचे असेल आणि परीक्षेचा अभ्यासक्रम www.joinindiannavy.gov.in वेबसाइटवर उपलब्ध आहे.
– परीक्षेचा कालावधी 30 मिनिटे असेल.
– लेखी परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांना त्याच दिवशी PFTचा अधीन करण्यात येईल

अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in

भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

 


हेही वाचा -

पुरेशा लस साठ्याअभावी शुक्रवारी अनेक ठिकाणी लसीकरण बंद

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा