Advertisement

आरबीआयने ठोठावला 'या' 4 बँकांवर 5.45 कोटींचा दंड

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी 4 बँकांना एकूण 5.45 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 बँकांचा समावेश आहे.

आरबीआयने ठोठावला 'या' 4 बँकांवर 5.45 कोटींचा दंड
SHARES

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी 4 बँकांना एकूण 5.45 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 बँकांचा समावेश आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सिटीबँकेला 4 कोटी, भारत को-ऑपरेटिव्ह बँकेला 60 लाख, टीजेएसबी सहकारी बँकेला 45 लाख आणि नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 40 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

मुंबईतील भारत को-ऑपरेटिव्ह बँकेने उत्पन्न मान्यता, मालमत्ता वर्गीकरण मानदंड आणि फ्रॉड यासंदर्भातील आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने सिटी बँकेवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वात जास्त म्हणजे 4 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे.  बँकिंग रेग्यूलेशन अॅक्ट अंतर्गत क्रेडिट सुविधा घेणाऱ्या ग्राहकांकडून डिक्लेरेशन न प्राप्त करणे, नॉन फंड फॅसिलिटीच्या सुविधेचे पालन न करणे या कारणांमुळे दंड सिटी बँकेवर दंड आकारला असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.

ठाण्यातील ठाणे जनता सहकारी बँक (TJSB) या बँकेवर उत्पन्न मान्यता आणि मालमत्ता वर्गीकरण मानदंड याकरता असणाऱ्या नियमावलीचे पालन न केल्यामुळे 45 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. याच नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने अहमदनगरमधील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 40 लाखाचा दंड ठोठावला आहे.

आरबीआयने गुरूवारी  बँक ऑफ इंडियावर एनपीएबाबतचे निर्देश पूर्ण न केल्याने 5 कोटींचा दंड आकारला होता. याच कारणासाठी कर्नाटक बँकेवर देखील 1.2 कोटींचा दंड आकारण्यात आला होता. 


हेही वाचा -

मोबाइल नंबर आता 11 अंकी होणार, 'हे' आहे कारण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा