Advertisement

जुलै ते सप्टेंबर दरम्यान निवासी घरांच्या विक्रीत वाढ

तिसऱ्या तिमाहीत मुंबई महानगर प्रदेशात (MMR) सर्वाधिक म्हणजेच ९ हजार २०० विक्री झाली.

जुलै ते सप्टेंबर दरम्यान निवासी घरांच्या विक्रीत वाढ
SHARES

अनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्सनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, देशातील ७ शहरांमध्ये २०२०च्या तिसऱ्या तिमाहीत २९ हजार ५२० घरांची विक्री झाली आहे. ही आकडेवारी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीतील आहे. ही आकडेवारी फारच उत्साहवर्धक नाही. कारण या ७ शहरांमध्ये २०२०च्या पहिल्या तिमाहीत ४५ हजार २०० घरांची विक्री झाली.

तिसऱ्या तिमाहीत मुंबई महानगर प्रदेशात (MMR) सर्वाधिक म्हणजेच ९ हजार २०० विक्री झाली. इतर शहरांपेक्षा मुंबईत अधिक विक्री झाली आहे. त्यामानानं बंगळुरू इथं ५ हजार २०० घरांती विक्री झाली. त्यानंतर पुण्यात ४ हजार ८५० घरांची विक्री झाली. दुसऱ्या तिमाहीत ७ शहरांची मिळून १२ हजार ७३० इतकी विक्री झाली होती.

एकूण विक्रीपैकी एमएमआर, बेंगळुरू, एनसीआर आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये ८४ टक्के विक्री झाली आहे. ही आकडेवारी विचारात घेता असं म्हणता येईल की, कोरोना महामारीचा तडाखा बसल्यानंतर पहिल्यांदा निवासी बाजारपेठेतील सुधारणेची चिन्हे दर्शविली गेली आहेत. विक्री अधिक नसली तरी सध्याच्या परिस्थितीत ही आकडेवारी दिलासादायक आणि प्रोत्साहन देणारी आहे.

आकडेवारीमध्ये असंही दिसून आलं आहे की, 2020 मधील पहिल्या तिमाही (४१ हजार २२०) च्या तुलनेत पहिल्या ७ शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या अपार्टमेंटची संख्या तिसऱ्या तिमाहीत (३२ हजार ५३०) मध्ये कमी आहे. याउलट हैदराबाद (४५ टक्के), कोलकाता (२४) टक्के) आणि एनसीआर (१० टक्के) यासारख्या भागांमध्ये पुरवठा वाढ नोंदवण्यात आली.

स्वतंत्रपणे, विक्री न झालेल्या यादीमध्ये वर्षाच्या तुलनेत ३ टक्क्यांनी घट दिसून आली तर पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत १ टक्क्यांची घट नोंदवली गेली. तिसऱ्या तिमाहीत निवासी विक्रीतील वाढीत अनिवासी भारतीयांचा मोठा वाट असल्याचं समोर येत आहे.



हेही वाचा

मुंबई-ठाण्यात म्हाडा परवडणारी घरं बांधणार- जितेंद्र आव्हाड

मुंबईतील ‘या’ जुन्या इमारतीतील रहिवाशांचं होणार पुनर्वसन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा