७५ रुपयांचं नवं नाणं लवकरच


७५ रुपयांचं नवं नाणं लवकरच
SHARES

पोर्ट ब्‍लेअर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी प्रथमच तिरंगा फडकावला होता. या घटनेला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत अाहेत. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकार ७५ रुपयांचे नवीन स्मारक नाणे अाणणार अाहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत एक परिपत्रकही जारी केलं अाहे. 


चांदी, तांबे, झिंकचं नाणं

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी पोर्ट ब्‍लेअर येथे प्रथमच तिरंगा झेंडा फडकावला होता. या घटनेस ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने केंद्र सरकारच्या अधिकृत टांकसाळेतून हे ७५ रुपयांचं नाणं तयार केलं जाणार अाहे. ३५ ग्रॅम वजन असलेल्या या नाण्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे अाणि निकेल व झिंक प्रत्येकी ५ टक्के असणार अाहे. या नाण्यावर सेल्युलर जेलच्या मागे तिरंग्याला सलामी देत असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं चित्र असेल. या चित्राच्या खाली ७५ वर्ष असं लिहिलेलं असेल. नाण्यावर देवनागरी, हिंदी अाणि इंग्रजी भाषेत प्रथम ध्‍वजारोहण दिवस असंही लिहिलेलं असेल. हेही वाचा - 

ग्राहकांनो, गृहकर्जाचा हप्ता भरण्याच्या जाहिरातींना भुलू नका!
संबंधित विषय