Advertisement

RTGS सेवा रविवारी १४ तासांसाठी बंद राहणार

आपत्कालीन काळात आरटीजीएस सिस्टमचा रिकव्हरी स्पीड वाढवण्यासाठी १८ एप्रिलला आरटीजीएसचं टेक्निकल अपग्रेडेशन केलं जाईल.

RTGS सेवा रविवारी १४ तासांसाठी बंद राहणार
SHARES

ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी (१८ एप्रिल) रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS -आरटीजीएस) सुविधा तब्बल १४ तास बंद राहणार आहे. त्यामुळे रविवारी ऑनलाईन पैसे ट्रान्सफरसाठी ग्राहकांना समस्या येऊ शकते.

आरटीजीएस सुविधा रविवारी कमीत-कमी १४ तासांपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. या काळात ग्राहक आरटीजीएस द्वारे पैसे ट्रान्सफर करु शकणार नाहीत. १८ एप्रिल रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत आरटीजीएस सेवा बंद राहील.

आरबीआयने याबाबत सांगितलं की,  आपत्कालीन काळात आरटीजीएस सिस्टमचा रिकव्हरी स्पीड वाढवण्यासाठी १८ एप्रिलला आरटीजीएसचं टेक्निकल अपग्रेडेशन केलं जाईल. त्यामुळे रविवारी आरटीजीएस सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी रविवारी ऑनलाईन ट्रान्झेक्शन करताना आपल्या पेमेंट ऑपरेशन्सचं प्लॅनिंग त्यानुसार करावं.

आरटीजीएस सेवा बंद असली तरी ग्राहक NEFT द्वारे ऑनलाईन ट्रान्झेक्शन करू शकतात. आरटीजीएसच्या तांत्रिक सुधारणांसाठी आणि चांगल्या ट्रान्झेक्शनसाठी हे पाउल उचललं जात आहे. आरबीआयकडून याबाबत लेखी सूचना जारी करण्यात आली आहे.



हेही वाचा - 

मार्चमध्ये सोन्याच्या आयातीत तब्बल ४७१ टक्के वाढ, 'हे' आहे कारण

अबब! मुंबईतील घर विकलं गेलं तब्बल १ हजार कोटींना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा