Advertisement

दिवाळीत ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा, एसबीआयचा ग्राहकांना अलर्ट

दिवाळीमध्ये ऑफर्सच्या नावाखाली अनेक फेक मेसेज ग्राहकांना पाठवले जातात. अशा मेसेजपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला स्टेट बँक ऑफ इंडियाने(एसबीआय) आपल्या ४२ कोटी ग्राहकांना दिला आहे.

दिवाळीत ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा, एसबीआयचा ग्राहकांना अलर्ट
SHARES

दिवाळीमध्ये ऑफर्सच्या नावाखाली अनेक फेक मेसेज ग्राहकांना पाठवले जातात. अशा मेसेजपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला स्टेट बँक ऑफ इंडियाने(एसबीआय) आपल्या ४२ कोटी ग्राहकांना दिला आहे. बँकेकडून ग्राहकांना ट्विट करून तसा अलर्ट पाठवण्यात आला आहे. 

एसबीआयने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, एसबीआय ग्राहकांना अशी विनंती करते की सोशल मीडियावर अलर्ट राहा आणि कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या किंवा बनावट मेसेजच्या जाळ्यात अडकू नका.' बँकेने पाठवलेल्या या मेसेजकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. कोरोना काळात अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत की ग्राहकांकडून त्यांचे पैसे लंपास झाले आहेत.

देशातील इतर सर्वच बँकांच्या ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती आणि बँकिंग माहिती कोणत्याही व्यक्तीबरोबर शेअर करू नका. असे केल्यास तुमच्या खात्यातील रक्कम चोरली जाऊ शकते. एटीएम पिन, कार्ड नंबर, अकाउंट नंबर आणि ओटीपी कधीही कुणाबरोबर शेअर करू नका, असा इशारा आपल्या ग्राहकांना दिला आहे. 

एसबीआयने याआधी त्यांच्या नावाने सुरू झालेल्या बनावट वेबसाइटविषयी देखील ग्राहकांना अलर्ट केले होते.  ग्राहकांनी या वेबसाइट संदर्भात येणाऱ्या नोटिफिकेशन बाबत अलर्ट राहणे गरजेचे आहे. अशा वेबसाइट ग्राहकांना त्यांचे पासवर्ड किंवा खात्यासंदर्भातील माहिती अपडेट करण्यास सांगतात, असं एसबीआयने म्हटलं आहे. हेही वाचा-

कोव्हॅक्सीन' लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सायन रुग्णालयात होणार

मुंबईतल्या सर्व दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे सक्तीचे- मुंबई पोलिससंबंधित विषय
POLL

आजच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स किती धावांचा डोंगर रचेल, असे वाटते ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा