Advertisement

SBI कडून खातेधारकांना अलर्ट, 'अशी' केली जातेय फसवणूक

सायबर क्राईमच्या वाढत्या घटना पाहता स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) त्यांच्या खातेधारकांना अलर्ट केलं आहे.

SBI कडून खातेधारकांना अलर्ट, 'अशी' केली जातेय फसवणूक
SHARES

देशात सध्या कोरोनाव्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन लागू केलं आहे. पण या सर्व परिस्थितीचा फायदा काही भामटे घेत असल्याचं समोर येत आहे. लॉकडाऊन दरम्यान सायबर क्राईमच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.


SBI काय म्हणाले?

सायबर क्राईमच्या वाढत्या घटना पाहता स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) त्यांच्या खातेधारकांना अलर्ट केलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे जवळपास ४४ कोटींहून अधिक खातेधारक आहेत. या खातेधारकांना ट्वीट करत SBI नं माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हे फसवणूक करणारे लोक ग्राहकांना चूना लावण्यासाठी एसएमएस (SMS) करत आहेत. एसएमएसमध्ये http://www.onlinesbi.digital ही एक फेक वेबसाइटची लिंक पाठवली जात आहे. जर तुम्हाला असा कोणताही एसएमएस आला तर त्वरीत तो डिलीट करा. त्याचप्रमाणे या एसएमएसमध्ये SBI NetBanking Page शी मिळतंजुळतं पेज पाठवून तुमची फसवणूक केली जात आहे.

इथं करा तक्रार

बँकेनं सांगितलं आहे की, जर तुम्हाला असा कोणता मेसेज आला तर तुम्ही epg.cms@sbi.co.in आणि report.phishing@sbi.co.in यावर ई-मेलद्वारे माहिती देऊ शकता. त्याचप्रमाणे cybercrime.gov.in/Default.aspx वर तक्रार देखील करू शकता.

‘ही’ घ्या काळजी

१) बनावट UPI आयडीवरून डोनेशन मागणाऱ्यांपासून सावध राहा.

२) कोणत्याही ई-कॉमर्स साइटवर कार्ड डिटेल सेव्ह करु नका.

३) कोणत्याही ई-मेलवर तुमच्या खात्यासंदर्भातील संवेदनशील माहिती देऊ नका.

४)कोणताही स्कॅम आढळून आल्यास त्यासंदर्भात रिपोर्ट करा.

५) कोरोना व्हायरस संबंधित कोणत्याही बातमीवर क्लिक करण्याआधी सोअर्सची खात्री करा.




हेही वाचा

पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, ICICIची 'ही' नवी सुविधा

पीएफमधून करमुक्त रक्कम काढता येणार, नियमांमध्ये बदल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा