Advertisement

SBI चा गृहकर्ज दर १ जानेवारीपासून ८ टक्क्यांच्या खाली

१ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या नवीन तिमाहीत एसबीआयकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

SBI चा गृहकर्ज दर १ जानेवारीपासून ८ टक्क्यांच्या खाली
SHARES

जर आपण घर विकत घेण्यासाठी कर्ज घेण्याची योजना आखत असाल तर आपण नवीन वर्षाची प्रतीक्षा करू शकता. कारण १ जानेवारीपासून देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा गृहकर्जाचा व्याज दर ७.९० टक्के असेल. दरम्यान, एसबीआयने याची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नसली तरी नवीन वर्षात गृहकर्ज स्वस्त होईल, अशी शक्यता बँक अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. 

आॅक्टोबरमध्ये आरबीआयने रेपो दरात ०.२५ टक्के कपात केली आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या नवीन तिमाहीत एसबीआयकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसबीआयचा गृहकर्ज व्याजदर सध्या ८.१५ टक्के आहे. नवीन वर्षात हा दर ७.९० टक्के होण्याची अपेक्षा आहे. 

गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना एसबीआयद्वारे प्रक्रिया शुल्क सध्या माफ केले जात आहे. ज्यांनी अन्य बँकेतून गृहकर्ज घेतले आहे आणि आता त्यांना गृहकर्ज एसबीआयकडे हस्तांतरित करायचे आहे, तर त्यांना प्रक्रिया शुल्कामध्ये ५० टक्क्यांहून अधिक सूट दिली जात आहे. नवीन गृहकर्ज घेणाऱ्यांनाही प्रक्रिया शुल्कामध्ये ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.


अन्य बँकांचे सध्याचे गृहकर्ज व्याजदर (टक्क्यांमध्ये)


बँकवेतनधारकांसाठीविनावेतनधारकांसाठी
पीएनबी7.95 - 8.70 टक्केउपलब्ध नाही
सेंट्रल बँक8.00 - 8.30उपलब्ध नाही
बँक ऑफ बडोदा8.15 - 9.15उपलब्ध नाही
इंडियन बँक8.20 - 8.48.30 - 8.55
आयसीआयसीआय8.60 - 8.958.75 - 9.10
बँक ऑफ इंडिया8.10 - 8.408.10 - 9.00



हेही वाचा -

बँक, विमा कर्मचारी ८ जानेवारीला संपावर

क्रेडिट कार्ड कर्जामुऴे त्रस्त असाल तर पाळा या टिप्स




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा