Advertisement

टाटा स्कायच्या ग्राहकांनो, 21 दिवसांनंतर 'हे' चॅनल दिसणार नाहीत!


टाटा स्कायच्या ग्राहकांनो, 21 दिवसांनंतर 'हे' चॅनल दिसणार नाहीत!
SHARES

तुम्ही जर टाटा स्कायचे ग्राहक असाल तर कदाचित 21 दिवसानंतर तुम्हाला स्टार इंडियाचे सर्व चॅनल दिसणार नाहीत. कारण स्टार इंडियाने डीटीएच ऑपरेटर टाटा स्कायला एक नोटीस पाठवला आहे. यामध्ये 21 दिवसानंतर स्टार इंडियाचे सर्व चॅनल डिसकनेक्ट केले जातील असे म्हंटले आहे. स्टार इंडिया आणि ट्वेन्टी फस्ट सेन्युरी फॉक्स यांचे टाटा स्कायबरोबर 30 टक्क्यांची भागीदारी आहे.


म्हणून स्टार इंडियाचे चॅनल दिसणार नाही!

एका रिपोर्टच्यानुसार ब्रॉडकास्टने म्हटले आहे की, 21 दिवसाच्या नंतर टाटा स्कायवर दाखवण्यात येणारे स्टार इंडियाचे सर्व चॅनल बंद पडण्याची शक्यता आहे. टाटा स्कायला यासंदर्भात एक नोटीसही पाठवण्यात आला आहे.

स्टार इंडियाने टाटा स्कायच्या ग्राहकांना नोटीस पाठवत म्हटले आहे. 'टाटा स्कायच्या ग्राहकांना सूचना करण्यात येते की, टाटा स्कायच्या डीटीएच ऑपरेटर्सनी स्टाक इंडियाच्या सर्व चॅनल्सच्या सदस्यत्व करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे स्टार इंडियाचे सर्व चॅनल्स बंद केले जातील.

नुकतेच स्टार इंडियाने भारतात विविध शहरांसाठी मल्टी सिस्टम ऑपरेटर (एमएसओ) इंडसइंड मीडिया अँड कम्युनिकेशन्स लि. (आईएमसीएल) या कंपनीला देखील एक नोटीस पाठवला आहे. ज्यामध्ये वेळेवर रक्कम न भरल्याचे म्हटले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा