Advertisement

ऑनलाइन फसवणुकीबाबत एसबीआयचा ग्राहकांना अलर्ट, दिला 'हा' संदेश

ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना आता आणखी एक अलर्ट पाठवला आहे.

ऑनलाइन फसवणुकीबाबत एसबीआयचा ग्राहकांना अलर्ट, दिला 'हा' संदेश
SHARES
ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना आता आणखी एक अलर्ट पाठवला आहे. बँकिंग संदर्भात काही टिप्स एसबीआयने ग्राहकांना ट्टिट करून दिल्या आहेत.  या टिप्सचा वापर करून तुम्ही ऑनलाइन फ्रॉडपासून वाचू शकता. ही खबरदारी घेतल्यास तुम्ही खूप मोठ्या ऑनलाइन फसवणुकीपासून वाचू शकता आणि त्यामुळे तुमचे पैसे देखील वाचतील, असं एसबीआयने ट्विटमध्ये म्हटलं आहे.   




दिला हा संदेश


प्रिय ग्राहक,

हे आमचे कर्तव्य आहे की आम्ही तुम्हाला ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवू. इथे बँकिंग संबंधित काही खबरदारी इथे देण्यात आल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

- हे आवश्यक आहे की तुम्ही नियमांचे पालन कराल आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर तुमचे वैयक्तिक बँकिंग डिटेल्स शेअर करणार नाही

- ईएमआय, डीबीटी किंवा पंतप्रधान केअर फंड किंवा कोणत्याही केअर फंड संबधात ओटीपी मागणाऱ्या कोणत्याही अनौपचारीक लिंकवर क्लिक करू नका.

- जाहिरातींच्या माध्यमातून लॉटरी, रोख रक्कम किंवा नोकरीचं आमिष देणाऱ्या बनावट योजनांपासून सावधगिरी बाळगा.

- बँकेशी संबधित विविध गोष्टींचा पासवर्ड वेळोवेळी बदला

-  कोणताही एसबीआय प्रतिनिधी त्यांच्या ग्राहकांकडे त्यांची वैयक्तिक माहिती, पासवर्ड, उच्च सुरक्षा पासवर्ड किंवा ओटीपीसाठी मेल/एसएमएस पाठवत नाहीत, हे लक्षात घ्या.



हेही वाचा -

अवघ्या एका दिवसात 20 हजार जणांना मद्यविक्रीची घरपोच सेवा... 

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४. ५ दिवसांवर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा