आज देशभरातील बँक कर्मचारी संपावर

 Mumbai
आज देशभरातील बँक कर्मचारी संपावर

मुंबई - 28 फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी बँकांचा संप असणार आहे. यामध्ये देशातील नऊ बँकेच्या श्रमिक संघटनेची प्रतिनिधी संस्था असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू)ने आक्रमक पवित्रा घेतलाय. खाजगीकरण आणि बँक कर्मचाऱ्यांसाठी असणारे कामगारविरोधी धोरण यामुळे हा संप पुकारण्यात आलाय. या संपामध्ये एसबीआय, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्यासह इतर बँका सहभागी होणार आहेत.

यूएफबीयूमधील बँकिंग क्षेत्रासंबंधीच्या नऊ संघटनांत एआयबीईए, एआयबीओसी, एनसीबीई, एआयबीओए आणि एनओबीओ आदी संघटनांसोबतच, खासगी बँका, परदेशी बँका, तसेच क्षेत्रीय आणि सहकारी बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी होणार आहे. जवळपास 10 हजार बँक कर्मचारी मंगळवारी संपावर असणार आहेत. हे 10 हजार कर्मचारी मुंबईतल्या आझाद मैदानात निदर्शन करणार आहेत.

"संपादरम्यान कॅशचे व्यवहार बंद असतील. फक्त आयसीआयसीआय आणि एचडिएफसी या बँक सुरू असतील," अशी माहिती ऑल इंडिया बँक फेडरेशनच्या वतीने विश्वास उटगी यांनी दिली. "या संपाला कामगार संयुक्त कृती समितीचा पूर्ण पाठिंबा आहे," असेही विश्वास उटगी यांनी सांगितले.

Loading Comments