Advertisement

Personal Loan चे 'ह्या' बँकांचे 'असे' आहेत व्याजदर

वैयक्तिक कर्ज घेताना त्यावरील व्याजदर कमीत कमी असला पाहिले यावर आपण लक्ष देतो. गृहकर्ज आणि वाहन कर्जासह अन्य कर्जापेक्षा वैयक्तिक कर्जाचा व्याजदर जास्त असतो.

Personal Loan चे 'ह्या' बँकांचे 'असे' आहेत व्याजदर
SHARES

प्रत्येकाला कधीकधी अचानक पैशांची आवश्यकता पडते. आपल्याकडे बँक बॅलन्स असल्यास आणि तो खर्च करायचा असेल तर आपली अडचण भागते.  अन्यथा आपण एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकाकडून कर्ज घेतो. मात्र, त्यांच्याकडे त्यावेळी पैसे नसले तर आपल्यापुढे कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. बँकेकडून आपल्या वैयक्तिक कर्ज (Personal Loan) द्यावे लागते. वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जापेक्षा किंचित वेगळे आहे.  तुमचे जर बँकेत खाते असेल तर बऱ्याच बँका तुम्हाला सहजपणे वैयक्तिक कर्ज देतील.

 वैयक्तिक कर्ज घेताना त्यावरील व्याजदर ( interest rates) कमीत कमी असला पाहिले यावर आपण लक्ष देतो. गृहकर्ज ( home loan) आणि वाहन कर्जासह (car loan) अन्य कर्जापेक्षा वैयक्तिक कर्जाचा (Personal Loan) व्याजदर जास्त असतो. कर्ज देताना बँका बऱ्याच गोष्टींचा विचार करून कर्ज देतात. व्याजदरही या बाबी विचारात घेऊन ठरवतात. ग्राहक कर्जाची रक्कम भरण्यास सक्षम असेल की नाही, ग्राहक कोणत्या कंपनीत काम करत आहे याची सर्व माहिती बँका घेतात. वैयक्तिक कर्जाला कधीकधी त्वरित कर्ज देखील म्हणतात.

जेव्हा आपण वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेता तेव्हा इतर बँकांच्या व्याजदराशी तुलना करा. कोणती बँक (bank) आपल्याला कमी व्याजदरावर वैयक्तिक कर्ज देत आहे ते पहा. याशिवाय आपण वैयक्तिक कर्ज देणाऱ्या विविध बँकांच्या हंगामी ऑफरवर देखील लक्ष ठेवले पाहिजे. वैयक्तिक कर्जासाठी चांगला क्रेडिट स्कोअर (Credit score) नेहमी ठेवा.

असे आहेत व्याजदर

बँक 
वैयक्तिक कर्जाचा व्याजदर (टक्के)
एसबीआय१०.५० ते १६.५५
एचडीएफसी१०.७५ ते २१.३०
युनियन बँक१०.१० ते १४.२०
आयडीबीआय९.६५ ते १२.४०
ओबीसी१०.३० ते ११.८०
येस बँक१०.९९
सेंट्रल बँक आॅफ इंडिया११ ते ११.२५हेही वाचा -

SBI चे ‘एफडी’वरील व्याजदर ६ वर्षांत ‘इतके’ घटले

मेट्रो स्थानकांना नाव देण्यासाठी एलआयसी, एसबीआयसह २८ कंपन्या इच्छुक
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा