Advertisement

टिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 5 कोटी

टिकटॉक कंपनीने (बाईटडान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी प्रा. लि) मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे.

टिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 5 कोटी
SHARES

टिकटॉक कंपनीने (बाईटडान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी प्रा. लि) मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे.  टीकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात पत्र पाठवलं आहे. गांधी यांनी म्हटलं आहे की, मुंबई आणि महाराष्ट्रात टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारावर असून राज्याप्रतीच्या सामाजिक दायित्वाची  त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृह विभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिले आहेत.

टिकटॉक वापरकर्त्यांपर्यंत कंपनीने कोरोनाबाबतची माहिती ऑनलाईन पद्धतीने पोहोचवून जनजागृतीचे काम केले आहे. कोविड १९ युद्धात सहभागी होण्यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशन जमा करण्याच्या व्यवस्थेसह या मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात येत आहे. या जागतिक आपत्तीमध्ये जबाबदार कॉर्पोरेट सिटिझन म्हणून कोरोना विषाणूविरूद्धच्या
लढ्यात सहभागी होण्यासाठी, सहकार्य करण्यासाठीच कंपनीने ही पाऊले उचलल्याचे निखील गांधी यांनी म्हटले आहे.


बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्यावतीने विजय कांबळे, जनरल मॅनेजर, मुंबई  यांनी सोमवारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांची मदत दिली. या रकमेचा धनादेश त्यांनी नुकताच मुख्यमंत्री कार्यालयात जमा केला. या मदतीसह आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २८५ कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करू इच्छिणाऱ्यांसाठी खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300



हेही वाचा -

मुंबई पोलिसांना मोठा दिलासा, ५५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा